Breaking
ब्रेकिंग

पोलीस-नागरिक विश्वास दृढ करण्यावर भर – पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

0 7 9 8 0 6

पोलीस-नागरिक विश्वास दृढ करण्यावर भर – पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

नूतन पोलीस अधीक्षक यांचे स्नेहबंधतर्फे स्वागत

अहिल्यानगर – “पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यासाठी सामाजिक संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. स्नेहबंधसारख्या संस्थांच्या सहकार्याने समाजाभिमुख उपक्रम राबवण्यावर भर देऊ.” असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले मुम्मका सुदर्शन यांचे स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे स्वागत करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी त्यांना वृक्ष देऊन शुभेच्छा दिल्या.
मुम्मका सुदर्शन हे २०२३ बॅचचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी असून यापूर्वी त्यांनी चंद्रपूर येथे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच पुणे येथे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे. शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी कोळसा तस्करी, अवैध दारू विक्री व इतर गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले.
यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे