चावरीया व ढाका या तरुणांची हत्या करणाऱ्याला फाशी दया – –
अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चावरीया व ढाका या तरुणांची हत्या करणाऱ्याला फाशी दया – –
अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी : संजय वायकर
लासलगाव येथे कुंदन नरेश चावरीया वय १७ वर्ष व बिड येथील यश देवेंद्र ढाका वय २२ वर्ष या दोन्ही वाल्मिक समाज्याच्या युवकाची निर्घृण पणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या बाबत आज अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने अहिल्या नगर येथील मा. जिल्हाधिकारी श्री.पंकज आशिया साहेब यांना निवेदन देण्यात आले.


या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जी लखन,जिल्हा सचिव अर्जुन जी चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते अनिल भैय्या जी तेजी,ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियन अनिल जी वाणे,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भैय्या जी मोरकरोसे,अजय जी सौदे,राजू जी चव्हाण,विक्की जी करोलिया,आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



