भिंगार समाज बांधव मोठया संख्नेने मातंग महामोर्चाच्या सहभागी होणार
भिंगार समाज बांधव मोठया संख्नेने मातंग महामोर्चाच्या सहभागी होणार
विशेष प्रतिनिधी : महेश कांबळे
नगर-भिंगार येथे सकल मातंग समाजाच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चाच्या आयोजन केले आहे.त्या संदर्भात आज समाज बांधवांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती.यामध्ये समाजातील बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने महामोर्च्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला
यावेळी रामभाऊ वडागळे, विजय पठारे,सुनील उमाप,निलेश सरोदे,रोहित कुचेकर,यश शेलार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले व मोर्चा संदर्भातील भूमिका स्पस्ट केली.विशेषतःसोनई प्रकरणावरून समाजामध्ये मोठा असंतोष आहे,सातत्याने होणार अन्याय विरोधात सर्व समाजाने एकत्र व्हावे असे आवाहन विजूभाऊ पठारे यांनी यावेळी केले
आता मातंग समाजाला जाहिर सभेत शिवीगाळ होऊ लागली, त्याच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी,अनु.जातीचे अ.ब.क.ङ व वर्गीकरणाची त्वरीत घोषना करावी,संजर वैरागर हल्ला करणाऱ्यांवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करून कुटुंबास पोलीस संरक्षण दयावे,दलित समाजावर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे.अमोल वांडेकर,अनिल शेटे,आकाश बेग,संदिप लांडे यांचे वडील यांच्यावर दंगल भडकवणे, जिवे मारण्याची धमकी देणे. या गुन्हांची कलमे नोंदवुन विशेष जन सुरक्षा कायदेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे.आदी मोर्चाच्या मागण्या आहेत
मोर्चा हा क्रांतीगुरु लहुजी वस्ताद चौक,लालटाकी ते जिल्हाधिकारी कार्यालयवर पायी जाणार आहे तरी या मोर्च्यात सर्व समाजाने व नगरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे


