Breaking
ब्रेकिंग

नारायणडोह जि.प. शाळेच्या शिक्षकांचा ग्रामस्थांकडून सन्मान

आदर्श शाळा’ पुरस्काराने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी स्वप्नील साठे, उपाध्यक्षपदी रफीक शेख

0 8 9 6 7 5

नारायणडोह जि.प. शाळेच्या शिक्षकांचा ग्रामस्थांकडून सन्मान

‘आदर्श शाळा’ पुरस्काराने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी स्वप्नील साठे, उपाध्यक्षपदी रफीक शेख

 

नारायणडोह : प्रतिनिधी
नारायणडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘आदर्श जि.प. शाळा’ म्हणून निवड झाल्याच्या अभिमानास्पद पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षकांचे अविरत परिश्रम, विद्यार्थ्यांची जिद्द आणि ग्रामस्थांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व गुणवत्तावाढीच्या उपक्रमांमध्ये शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. ‘आदर्श शाळा’ हा बहुमान केवळ शाळेचा नसून शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय शिक्षण समिती आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी स्वप्नील बाबासाहेब साठे तर उपाध्यक्षपदी रफीक गुलाब शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून शाळेच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम, संस्कार व कौशल्यविकास यावर यापुढेही भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेचा शैक्षणिक आलेख सातत्याने उंचावत राहावा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी एकजुटीने कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे