Breaking
ब्रेकिंग

तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक करावे :- ह.भ.प. श्री माऊली महाराज पठाडे…

0 3 9 0 2 5

तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक करावे :- ह.भ.प. श्री माऊली महाराज पठाडे…

हिवरगाव पावसा / प्रतिनिधी :  नितीनचंद्र भालेराव 

आई- वडिलांचा मान करणाऱ्यांचे जग सुद्धा सन्मान करते.आजच्या ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहील्यास नक्कीच गावातील भावी पिढी आय.ए.एस /आय.पि.एस झाल्याशिवाय राहणार नाही. असा संदेश ह.भ.प. श्री माऊली महाराज पठाडे कर्जतकर यांनी तरुण पिढीला केला.

पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या जागृत देवस्थान श्री खंडेराव महाराज म्हणून अख्खा महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात याच परिसरात भक्तीपंढरी भव्यदिव्य बारा दिवसीय सप्ताह सोहळा अगदी दिमाखात चालू आहे.याठिकाणी महाराष्ट्रातील अनेक मोठ मोठे प्रसिद्ध किर्तनकार यांचे सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने संध्याकाळी ७ ते ९ किर्तने चालू आहेत.किर्तन संपल्यानंतर चार पाच हजार भाविकांसाठी भोजन दान दर दिवस चालु आहे.अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या पाचव्या दिवसांची सेवा महाराष्ट्र भूषण सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री माऊली महाराज पठाडे कर्जतकर यांचे किर्तन झाले.त्या किर्तनसेवेत बोलतांना महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना संदेश देताना सांगितले की जो आज समाजामध्ये आई-वडिलांची सेवा करेल त्यांचा मान राखेल जग त्यांचा मान सन्मान करेल त्याचप्रमाणे आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून पहा तुमचा परिवार सुखी आणि समाधानी राहील,या आपल्या आयुष्याचा स्वःताच्या हाताने नाश करू नका. असे अनमोल जीवन मंत्र सांगितला या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले चित्त शुद्ध ठेवा,एकाग्र मन करुन भगवंताचे चिंतन करा, तरूणांनी स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रयत्न करुन IAS/IPS अशा मोठमोठ्या परिक्षा पास होऊन गावाचे नाव उज्वल करावे त्यामूळे जीवनाचे, नरदेहाचे सार्थक होईल असा मोलाचा संदेश दिला.तसेच ह.भ.प.श्री माऊली महाराज पठाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवनपट हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.शिवाजी महाराजांच्या चरित्राची,त्यांच्या पराक्रमाची,स्वराज्य स्थापन करताना त्यांना आलेल्या अडचणींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.ही माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.

स्व.नामदेव मु.पठारे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेली किर्तनसेवापुष्पात तबला वादक, गायक,पिंपळगाव वाघा व दैठणे गुंजाळ येथील तरूण भजनी मंडळांनी त्यांना साथ दिली. यावेळी मनिपुर राज्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री अभिजित पठारे साहेब श्री खंडेराव महाराज मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष नामदेव गुंजाळ, सरपंच बंटी गुंजाळ, बापुराव गुंजाळ, सचिन गुंजाळ,मोहन गुंजाळ, आकाश येवले, निखिल भोर, सोशल मीडिया पत्रकार केतन येवले ,राम तांबे,शुभम मेहेर, अरविंद पठारे, गणेश झंजाड रोहन गुंजाळ, साहेबराव गुंजाळ सबाजी येवले, संतोष गुंजाळ, निवेदक जयसिंग गुंजाळ सह पंचक्रोशीतून आलेले हजारो भाविक भक्त व दैठणे गुंजाळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या किर्तनायासाठी सौजन्य स्व. नामदेव मुक्ताजी पठारे यांच्या स्मरणार्थ श्री बाबासाहेब पठारे यांनी दिले होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे