करमाळ्यात आकर्षक सजावट,मर्दानी प्रात्यक्षिके,रक्तदान,विविध बॅण्ड पथके,घोडे यांचेसह भव्य-दिव्य मिरवणूकीने शिवजयंती उत्सव साजरा…
करमाळ्यात आकर्षक सजावट,मर्दानी प्रात्यक्षिके,रक्तदान,विविध बॅण्ड पथके,घोडे यांचेसह भव्य-दिव्य मिरवणूकीने शिवजयंती उत्सव साजरा…
करमाळा विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
छत्रपती शिवाजीमहाराज की जय…जय भवानी जय शिवाजी…जय जिजाऊ,जय शिवराय च्या जयघोषात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रम व मर्दानी चित्तथरारक प्रात्यक्षिक व भव्य मिरवणुकीने साजरी करण्यात आली.
शिवजयंती निमित्त येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला व नंतर हजारो शिवभक्तांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यासाठी मोठ- मोठ्या रांगा लावून मोठ्या जल्लोषात व उत्साहात दर्शन घेतले.
बरोबर सायंकाळी 5.55 वाजता छत्रपतींच्या प्रतिमेची आकर्षक सजावटीसह भव्य-दिव्य मिरवणूक विविध वाद्यांच्या निनादात घोड्यांच्या ताफ्यासह हजारो शिवभक्तांच्या जल्लोषात किल्ला वेस येथुन सुरूवात झाली व मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजीमहाराज चौकात करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
आकर्षक व देखणी सजावट…
छत्रपती शिवाजीमहाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यास आकर्षक सजावट करून समोरील बाजूस तत्कालीन शुर योध्दे यांचेही लढवय्ये फोटो लोकांचे लक्ष वेधत होते. या चौकात राजसदर सारखे चित्र निर्माण केले होते.
सालाबादप्रमाणे भव्य स्वयंस्फूर्त रक्तदान शिबीर, मारूती मंदिरात आयोजीत,यावेळी शेकडो तरूण युवक-युवतींनी रक्तदान केले. छत्रपतींच्या पुतळ्यास अभिषेकानंतर विविध मर्दानी कार्यक्रमाचे स्वयंस्फूर्त कलाकारांनी आपली चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित शिवभक्तांची दाद मिळविली. यामध्ये दांडपट्टा,तलवारबाजी,कराटे,मल्लखांब,उंचदोरी यासारखे कलांचा समावेश आहे.
शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका यांच्यावतीने 395 व्या शिवजयंतीचे आयोजन.
18 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आताशबाजी करून , छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष.
या मिरवणुकीचे स्वरूप जय गणेश डीजे साऊंड व लाईट पुणे , नागनाथ लेझीम संघ शेटफळ , चाऊस बँड वैजापूर , सुजित बँड वाशी , अमर बँड बारामती , रज्जाक भाई बँड करमाळा , झंकार बँड करमाळा ,भाई भाई बँड करमाळा ,दोस्ती बँड करमाळा , अनिकेत फोटोग्राफी ,एस के लीड वाल वCO2 पेपर ब्लास्टर , तसेच घोडे हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. छत्रपतींच्या पुतळ्यास स. 7.00 ज्ञानप्रबोधिनी मुकबधिर शाळा कोर्टी येथील विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या हस्ते पंचाभिषेक करण्यात आला .