Breaking
ब्रेकिंग

‘मामा टी हाऊस’ हे अमळनेर शहरातील एकमेव ठिकाण ;  जेथे नेहमी होते चहा शौकिनांची गर्दी

0 3 9 0 2 7

‘मामा टी हाऊस’ हे अमळनेर शहरातील एकमेव ठिकाण ;  जेथे नेहमी होते चहा शौकिनांची गर्दी . . .

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

हिवाळ्याचे दिवस  असो  की नसो की पण प्रत्येकाला  गरमागरम वाफाळलेला गुळाचा चहा प्यायला आवडतो. तरी चहा पिण्याची इच्छा होते, असा स्पेशल चहा पिण्यासाठी ‘मामा टी हाऊस’ या अमळनेर शहरातील एकमेव म्हणजे ठिकाणी चहा शौकिनांची नेहमी गर्दी पाहायला मिळत आहे.

अमळनेर : अमळनेर शहरात बसस्थानका समोर स्व. पिरन पाटील यांनी १९७० ला चहा व्यवसायाला सुरुवात केली होती. लज्जतदार चहाचा दर्जा टिकवून ठेवल्याने आजतागायत कायम आहे. हा व्यवसाय कल्पेश (सोनू) पाटील सांभाळत आहेत. व्यवसायात ही त्यांची चौथी पिढी काम करीत आहेत. आरोग्यासाठी गुळाचा चहा प्यायलाच हवा.. स्पेशल. गुळाचा चहा.. हे त्यांच्या व्यवसायाचे ब्रीद वाक्य आहे… गुळाचा चहा घेण्याऱ्यांची संख्याही वाढली आहे.

स्पेशल लज्जतदार चहा पिण्यासाठी शहरात मामा टी हाऊसवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते सर्वच वर्गातील चहा शौकिनांची पावले या मामा टी हाऊसकडे वळताना दिसतात. विना पाणी दूध, उत्तम प्रतीचा गूळ व चहा पावडर यासाठी वापर केला जातो. गेल्या ५४ वर्षांपासून मामा टी हाऊस वरील गुळाचा चहा ग्राहकांच्या पसंतीचा उतरला आहे. पहाटे पाच वाजेपासून चहाचे दुकान सुरू होते. ते सायंकाळी उशिरापर्यंत सुरू राहते. शहरासह, बाजार पेठेत आलेले ग्रामीण भागातील नागरिकांची पावलेही ‘मामा टी हाऊस’ चहा सेंटरकडे वळतात.

4.5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे