पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी सुटका करून आरोपीस राहुरी पोलिस तपास पथकांनी घेतले ताब्यात
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून पळवून आणलेली अल्पवयीन मुलगी सुटका करून आरोपीस राहुरी पोलिस तपास पथकांनी घेतले ताब्यात
राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख
शिरूर येथील अल्पवयीन मुलगी ही दिनांक 29/01/2025 रोजी रात्री 02:00 वाजेच्या दरम्यान आरोपीं नामे सौरभ सुरेश धुळे वय 19 वर्ष राहणार शिरूर तालुका पुणे हा त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगी हीस घेऊन ब्राह्मणी येथे घेऊन आला असल्याची बातमी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस तपास पथक यांना रवाना केले व सदर ठिकाणी गेलो असता सदर बातमीची खात्री केली असता त्यांच्यावर दिनांक 29/01/2025 रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून वरील सदर आरोपीतास पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांच्या ताब्यात दिले आहे. पीडित मुलीस तिचे आईवडलांचे सुखरूप ताब्यात दिले आहे. तसेच राहुरी पोलीस ठाणे गुर क्रमांक 07/2025 मधील अल्पवयीन मुलीस पळून नेले होते सदर मुलीस राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच त्यास पळून येणाऱ्या आरोपीचा राहुरी पोलीस ठाणे शोध घेत आहे.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई खोंडे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोकॉ/प्रमोद ढाकणे, पोकॉ/ सतीश कुऱ्हाडे, पोकॉ/नदीम शेख, पोकॉ सचिन ताजणे ,पोकॉ/अंकुश भोसले, पोकॉ/सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आतापर्यंत राहुरी पोलिसांनी 57 पळवून नेलेल्या मुलींचा शोध लावलेला आहे त्यापैकी 46 मुली व 11 मुले आहेत तसेच परप्रांतातून पळवून आणलेल्या 6 अल्पवयीन मुली व त्यांना पळून आणलेल्या आरोपींचा शोध लावून संबंधित राज्य पोलिसांकडे सोपवले आहे.*
*तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या आसपास अल्पवयीन मुलगी संशयास्पद अवस्थेत मिळून आल्यास राहुरी पोलीस ठाण्यास संपर्क साधावा ही विनंती संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राहुरी यांनी केली आहे .