दहिगावची कन्या वैष्णवी वाघ पोलीस दलात निवड

*दहिगावची कन्या वैष्णवी वाघ पोलीस दलात निवड
नगर / प्रतिनिधी: शिवा म्हस्के

नगर तालुक्यातीलश दहिगाव येथील शेतकरी कुटुंबातील बबनराव आसाराम वाघ यांची कन्या वैष्णवी वाघ हिची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात चांगल्या गुणांनी निवड झाली.यांच निवडीच्या धर्तीवर दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री राम देवस्थाना मध्ये वैष्णवी चा जोरदार नागरी सत्कार सन्मान करण्यात आला होता वैष्णवी दुसऱ्याच प्रयत्नात तीची मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील हि दहिगावातील तीसरी मुलगी पोलीस विभागात जाण्याची बहुमान मिळवला आहे.या आधी हसीना शेख यांची अहिल्यानगर पोलीस दलात निवड झालेली आहे.दुसरी मुलगी ज्योती बनकर हिची मुंबई शहर पोलीस दलात निवड झाली आहे.आता हि वैष्णवी वाघ तीसरी मुलगी मुंबई लोहमार्ग पोलीस दलात निवड झाल्याने दहिगावसह पंचक्रोशीतील पालकांचा मुली वरील विश्वास दृढ झाला आहे .मुली जिद्द चिकाटी अभ्यास शारीरिक मेहनत बळावर पोलीस होत आहे. वैष्णवी वाघ पंचक्रोशीतुन अभिनंदन वर्षाव होत आहे.


