ज्ञानसंपदा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
ज्ञानसंपदा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी भारतरत्न डॉ.सी. व्ही. रामन यांच्या संशोधनकार्याच्या सन्मानार्थ ज्ञानसंपदा शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. विज्ञान दिनाच्या निमित्ताने ज्ञानसंपदा शाळेमध्ये नर्सरी ते ८वी च्या मुलांसाठी गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सोडियम हायड्रॉक्साइड अल्कली व फिनोफथेलिन इंडिकेटर यांच्या रासायनिक अभिक्रियेतून होणाऱ्या विशिष्ट प्रक्रियेचा उपयोग करून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुषमा दरे (न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज) प्रा. श्रद्धा इंगळे (न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज)प्रा. प्रतीक महाजन (पेमराज सारडा कॉलेज) हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या प्रा. सुषमा दरे यांनी आपल्या मनोगतामध्ये प्राचीन ऋषीमुनींचे तत्वज्ञान व आधुनिक वैज्ञानिक यांच्या विचारांची सांगड विविध उदाहरणे देऊन घातली. तर प्रा. श्रद्धा इंगळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी वैज्ञानिक चित्रपट, वेबसाईट व विविध ॲप्स याविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. गणित- विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता नर्सरी ते ८ वी च्या सर्व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिवांजली अकोलकर माध्यमिक विभागाच्या समन्वयक सौ. पूजा भाटिया यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सौ अर्चना पाटील, सौ मुक्ता दिवेकर, व श्री प्रसाद बर्वे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर सौ दिपाली ठेंगणे यांनी आभार मानले.



