Breaking
ब्रेकिंग

जिल्हा मराठा च्या श्रमप्रतिष्ठा योजनेअंतर्गत जनता विद्यालयात सायकल वाटप

0 7 6 9 4 3

जिल्हा मराठा च्या श्रमप्रतिष्ठा योजनेअंतर्गत जनता विद्यालयात सायकल वाटप

विशेष प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

वाळकी :  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगर या संस्थेच्या श्रम प्रतिष्ठा योजनेअंतर्गत जनता विद्यालय रुईछत्तीसी येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहिल्यानगर या संस्थेमार्फत श्रमप्रतिष्ठा योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा योजनेचे अध्यक्ष श्री जी.डी. खानदेशी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री रा.ह. दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव श्री विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त श्री मुकेश मुळे व संस्थेच्या सर्व विश्वस्तांच्या संकल्पनेतून यावर्षी सायकल वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता विद्यालयांमध्ये ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते .यावेळी जनता विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धामणे, पर्यवेक्षक श्री दत्ता पाटील नारळे, रमेश भांबरे, किरण भापकर, ॲड. लक्ष्मणराव गोरे,बाळासाहेब खाकाळ, अंकुश गोरे, मा.प्राचार्य श्री चंद्रकांत भवर, लक्ष्मण जगदाळे, भरत भुजबळ, प्रवीण गोरे, पत्रकार देविदास गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे