पहलगाम घटनेचा निषेध निषेध निषेध ; ३ मे रोजी मूकमोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
शंभरवर संस्था - संघटनांची एकजूट दिसणार ...

पहलगाम घटनेचा निषेध निषेध निषेध ; ३ मे रोजी मूकमोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
शंभरवर संस्था – संघटनांची एकजूट दिसणार …
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- जळगावकर नमस्कार …पहलगाम (काश्मीर) मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २५ हिंदू आणि एका स्थानिक मुस्लिमाची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या *शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी* जळगाव शहरातील नागरिकांचा मूकमोर्चा निघणार आहे. भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येक जळगावकराच्या मनांत जागृत करून निर्दोष मृत पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्याचा मोर्चा आहे. या मोर्चात जास्तीत जास्त पुरूष – महिला, युवक – युवतींनी सहभागी व्हायचे आहे. पहलगाम येथील क्रूर घटनेनंतर पाकिस्तानच्या कट – कारस्थानी कृत्यांचा पुन्हा अनुभव आला आहे. अशावेळी प्रत्येक जळगावकरने मूकमोर्चात सहभागी होऊन संघटीत रोष दर्शवायला हवा.
हा मोर्चा आहे कशासाठी ? या विषयी मोर्चा संयोजक *जळगाव नागरिक मंच आणि सहयोगी जवळपास १०० संस्था – संघटनांनी* सविस्तर भूमिका जाहीर पत्रकातून व्यक्त केली आहे. जम्मू – काश्मीरसाठी असलेले विशेष ३७० कलम रद्द केल्यानंतर तेथे सुव्यवस्थापन स्थापनेसाठी केंद्र सरकार व नायब राज्यपाल प्रयत्न करीत होते. त्यात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा निवडणूक घेण्यास सरकारला भाग पाडले. तेथे आज सत्तेत असलेले *ओमर अब्दुल्ला यांचे सरकार ‘दुतोंडी’ आहे.*ओमर हे आजही काश्मीरला भारतापासून स्वतंत्र प्रदेश मानतात. त्यामुळे त्यांच्या सत्तेच्या कालखंडात काश्मीरमध्ये पुन्हा फुटीरतावादी विचारसरणी विस्तारत आहे. याशिवाय संपूर्ण *भारतात कुठेही दहशतवादी, उग्रवादी किंवा अतिरेकी घटना घडत असल्याचे दिसत नाही. उलट पाकिस्तानात बलुचिस्तान, पंजाब प्रांतात सतत घात – पात होत आहे. म्हणून पुन्हा काश्मीरमध्ये निर्दोष पर्यटकांना ठार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे.
या मूकमोर्चात घोषणा फलक हातात असतील. मौखिक कोणतीही घोषणा दिली जाणार नाही. हा मोर्चा पूर्णतः अराजकीय आहे. मात्र विविध राजकीय विचारधारा असलेले नागरिक मौन धारण करीत मोर्चात सहभागी होऊ शकतात.*मूकमोर्चा धर्म, समाज व जात विरोधात नाही. पण भारतात राहून पाकिस्तान धार्जिणे किंवा धर्माधारित कोणतेही अमानविय कृत्य करण्याची छुपी अभिलाषा बाळगणाऱ्यांना भारतीय राष्ट्रीयत्वाची ताकद दाखवणारा हा मोर्चा आहे. म्हणून जळगावकरांनी मोर्चात सहभागी व्हायचे आहे.
जळगाव शहरातील बाजारपेठ उद्या शनिवार, दि. ३ मे २०२५ ला सकाळी ७ ते दुपारी ३ अशी अर्धा दिवस बंद ठेवावी असे आवाहन केले आहे.*रस्त्यावर हाॅकर्स म्हणून व्यवसाय करणाऱ्या, जळगाव महानगर पालिकेच्या २२ आणि इतर खाजगी व्यापारी संकुलातील दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक यांनी किमान देशप्रेमाची भावना दर्शविण्यासाठी बंद मध्ये सहभागी व्हावे. मूकमोर्चाच्या मुख्य प्रवाहात इतर कणामुळे येऊ न शकणार्या मोहल्ला, वस्तीतील नागरिकांनी किमान घरावर काळे ध्वज लावावेत अशी अपेक्षा आहे.
मूकमोर्चाचा प्रारंभ सकाळी ७ वा शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पूष्पार्पण करून होईल. तेथून नेहरू पुतळा चौक, टाॅवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, सिव्हिल हाॅस्पिटल, पांडे डेअरी चौक , मुख्य टपाल कार्यालयमार्गे स्वातंत्र्य चौकात जाईल. तेथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले जाईल. मूकमोर्चात सहभागी होताना तोंडावर काळी मुखपट्टी लावणे, उजव्या दंडावर काळी फित लावणे आवश्यक आहे. प्रत्येकाने किमान पांढरा किंवा काळा शर्ट परिधान करावा. महिलांनी पांढरी साडी घालावी.
मूकमोर्चा हा घराच्या गॅलरीतून / दुकानाच्या काऊंटरवरून / दुचाकी – चारचाकी वाहनावरून / मोबाईलशी चाळा करीत पाहू नका … रस्त्यावर उतरा … सहभागी व्हा …. म्हणजे भविष्यात पाकिस्तानातील दहशतवादी वा आपल्यातलेच छुपे राष्ट्र विरोधी पुन्हा कोणतेही कृत्य करायला धजावणार नाहीत …
जय भारत … जय महाराष्ट्र … जय जळगाव
_जळगाव नागरिक मंचचे आवाहन_