Breaking
ब्रेकिंग

खेळाडूंच्या यशामागे प्रशिक्षणाची शिस्त आणि मेहनत – डॉ. उद्धव शिंदे

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये भिंगार स्पोर्ट्स क्लबचा डंका – 'स्नेहबंध'तर्फे खेळाडूंचा सन्मान

0 8 6 5 1 0

खेळाडूंच्या यशामागे प्रशिक्षणाची शिस्त आणि मेहनत – डॉ. उद्धव शिंदे

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये भिंगार स्पोर्ट्स क्लबचा डंका – ‘स्नेहबंध’तर्फे खेळाडूंचा सन्मान

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने जामखेड येथे आयोजित खुल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने खेळाडूंचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ. शिंदे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “खेळामुळे शिस्त, चिकाटी व आत्मविश्वास वाढतो. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे यासाठी समाजाने त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.”
या स्पर्धेत नवनाथ बेद्रे (५ किमी – द्वितीय क्रमांक), ओंकार रासकर (२ किमी – द्वितीय), माही परदेशी (५ किमी – तृतीय), हरप्रीत भगवाने (२ किमी – द्वितीय) व हर्षदा घोलप (२ किमी – प्रथम) यांनी यश मिळविले. या खेळाडूंना प्रशिक्षक मेजर विठ्ठल काळे तसेच राष्ट्रीय खेळाडू शंकर औरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

“ग्रामीण व शहरातील युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे. स्नेहबंध फौंडेशन खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहील.”
– डॉ. उद्धव शिंदे

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे