Breaking
ब्रेकिंग

विकास पालवे उर्वरित कार्यकाळातही नागरिकाभिमुख व उत्कृष्ट सेवा देतील” – डॉ. उद्धव शिंदे

0 8 6 5 0 8

विकास पालवे उर्वरित कार्यकाळातही नागरिकाभिमुख व उत्कृष्ट सेवा देतील” – डॉ. उद्धव शिंदे

प्रवर अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर यांच्या एक वर्षाच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त ‘स्नेहबंध’ तर्फे सत्कार व शुभेच्छा

अहिल्यानगर : प्रवर अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर विकास पालवे यांनी आपल्या कार्यकाळातील एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे यांनी पालवे यांना पुढील उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना सांगितले की, “विकास पालवे यांनी गेल्या एका वर्षात डाक विभागाच्या सेवांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत नागरिकाभिमुख काम केले आहे. त्यांनी यापुढील कार्यकाळातही याच समर्पणाने व कार्यक्षमतेने काम करून विभागाची आणि अहिल्यानगरची सेवा अधिक प्रभावीपणे करावी.”
या प्रसंगी कार्यालयीन स्टाफ शिवाजी लांडे, सुनील भागवत, सागर पंचारिया, सचिन अस्वर, श्रीमती शुभांगी ससकर, श्रीमती निलिमा शेकटकर, श्रीमती अश्विनी चिंतामणी व श्रीमती अर्चना गोसके उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे