Tv9 चे करमाळा – परांडा चे प्रतिनिधी शीतलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार’ जाहीर
Tv9 चे करमाळा – परांडा चे प्रतिनिधी शीतलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार’ जाहीर
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ Tv9 चे करमाळा – परांडा प्रतिनिधी शीतलकुमार मोटे यांना जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने ‘राज्यस्तरीय क्रांतिसूर्य पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.
याबाबत जगदीशब्द फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जगदीश ओहोळ यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले कि, करमाळा तालुक्यातील पाथूर्डी या गावातून आलेल्या शीतलकुमार मोटे यांचे पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करतात. त्यांचे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्या अनुषंगाने जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने शीतलकुमार मोटे यांना ‘राज्यस्तरीय क्रांतिसुर्य पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी, पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंजपेठ येथे पार पडणार असून सर्व करमाळा व तालुक्यातील साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन जगदीश ओहोळ यांनी केले आहे.