Breaking
ब्रेकिंग

SW न्यूजचे उपसंपादक सूर्यकांत होनप यांची करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या तालुका सहसचिवपदी निवड

0 3 9 0 7 2

करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहिर

करमाळा: करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे नूतन कार्यकारिणी दि. 1/3/2025 रोजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी जाहीर केली. एस डब्ल्यू न्यूजचे उपसंपादक सूर्यकांत होनप यांची करमाळा तालुका सहसचिव पदी निवड करण्यात आली. सूर्यकांत होनप यांना सदर निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांच्या हस्ते देण्यात आले.

डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, प्रदेश उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांनी नुतन कार्यकारिणी निवड जाहीर केली.

करमाळा तालुका उपाध्यक्षपदी टी. व्ही. 9 मराठीचे शितलकुमार मोटे, कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे, तर सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी सुर्यकांत होनप, खजिनदारपदी ॲड. सचिन हिरडे, किशोरकुमार शिंदे, तालुका संघटक राजू सय्यद, सहसंघटक तुषार जाधव, तालुका संपर्कप्रमुख अंगद भांडवलकर, सहसंपर्कप्रमुखपदी सागर गायकवाड, तालुका व्यवस्थापक संजय साखरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल दामोदरे, तालुका प्रवक्तेपदी प्रा. नंदकिशोर वलटे, कार्यवाह नितीन झिंजाडे, सहकार्यवाह राजाराम माने यांची निवड करण्यात आली आहे.

बैठकीला उपस्थित असणाऱ्या नवनियुक्त सर्व पत्रकार बांधवांना निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्रा. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी शेखर स्वामी, संजय मस्कर, सचिन चव्हाण, प्रवीण अवचर, अविनाश जोशी, संजय कुलकर्णी, नागेश चेंडगे, सचिन जव्हेरी, संजय तेली यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड. बाबूराव हिरडे, नासिर कबीर, अलीम शेख, आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, सुहास घोलप, डी. जी. पाखरे, आण्णा काळे यांची निवड करण्यात आली आहे.

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे