पंचायत समितीच्या अभियंता श्री.साठे यांचे धक्कादायक व भ्रष्टाचार उघड करणारे वक्तव्य

पंचायती समितीच्या अभियंता श्री.साठे यांचे धक्कादायक व भ्रष्टाचार उघड करणारे वक्तव्य
प्रतिनिधी :- पंकज पाटील
मंगरुळ :- मंगरूळ अमळनेर येथील ग्रामस्थ मिलिंद भिकन पाटील यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या सार्वजनिक स्वच्छालय परिसरातील संरक्षण भिंतीच्या अत्यंत निकृष्ट व अनियमित कामाबाबत पंचायत समिती अमळनेर येथे सातत्याने तक्रारी केल्या. त्यानुसार त्यांनी दिनांक १२/०१/२०२६ व २०/०१/२०२६ रोजी गटविकास अधिकारी यांना रोजनामे व स्मरणपत्र दिले. तसेच संबंधित अभियंता श्री. साठे यांच्याकडेही लेखी तक्रार केली.
मात्र या सर्व तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. उलट, अभियंता श्री. साठे यांनी मिलिंद पाटील यांना थेट भेटून अत्यंत धमकीच्या स्वरूपात सांगितले की, “तुमच्यासारखे ५६ लोक येतात, आम्ही ते अर्ज पाहायला रिकामे नाहीत. आम्हाला खालून वरून सगळ्या ठिकाणी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जळगाव तसेच मा.गटविकास अधिकारी अमळनेर यांना योग्य त्या गोष्टी द्यावे लागतात. त्यामुळे तुझे असे ५६ अर्ज मी काय करू? तुला माझी तक्रार कुठे करायची तिकडे कर. माझं कुणी काही करू शकणार नाही कारण मी सगळ्याना सर्व गोष्टी पुरवतो.”याचा अर्थ असा आहे कि या अभियंता ला वरिष्ठ ना काही तरी द्यावं लागत असं आहे. या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांना या अभियंत्याने अजिबात घाबरलेले नाही. त्याचे बोलणे सरळ सरळ सूचित करत आहे की, “मी सगळ्यांना पुरवतो, म्हणून तुमच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष देणार नाही.”
वस्तुस्थिती अशी आहे :
१.अंदाजपत्रकानुसार २२ स्तंभ बांधायचे होते, प्रत्यक्षात केवळ १४ स्तंभ बांधले.
२.भिंतीची लांबी अंदाजपत्रकानुसार २२ कॉलम प्रमाणे असायला हवी होती, प्रत्यक्षात १४ कॉलम प्रमाणे बांधली.
३.घाई घाई त प्लास्टर करून सर्व स्तंभांची संख्या लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
४.अंदाजपत्रकनुसार खांबाची खोली १.२० मीटर असून प्रत्यक्षात खांबाची खोली २ फूट इतकी आहे.
५.भितीच्या बांधकामात फ्लाय ॲश विटाचा वापर अनिवार्य असतांना त्या जागी साध्या कच्चया विटाचा वापर केला आहे.
यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी. अभियंता श्री. साठे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. संपूर्ण कामाची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपव्यय थांबवावा व ग्रामस्थांच्या पैशाचे संरक्षण करावे.



