SEBC च्या विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे सवलतीच्या योजना लागू करव्यात:- प्रा. रामदास झोळ सर यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी निवेदन
SEBC च्या विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे सवलतीच्या योजना लागू करव्यात:- प्रा. रामदास झोळ सर यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी निवेदन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ आज मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनामध्ये खुल्या प्रवर्गातील लाखो गरीब विद्यार्थ्यांनी SEBC चे प्रमाणपत्र काढून SEBC या प्रवर्गातून प्रवेश घेतले आहेत. त्या विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे सर्व सवलतीच्या योजना लागू कराव्यात असे म्हटले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने
1. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास (SEBC) च्या विद्यार्थ्यांना 2014 च्या आरक्षणाप्रमाणे राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तसेच डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांचा लाभ संबंधित प्रशासकीय विभागाकडून देण्यात यावा.
2. इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सर्व 1554 अभ्यासक्रमाबाबत 14 जून 2024 चा शासन निर्णय SEBC च्या विद्यार्थ्यांना लागू करावा व त्याचा लाभ लवकरात लवकर SEBC विद्यार्थ्यांना मिळावा.
3. मागास बहुजन समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना Against CAP मध्ये प्रवेशित विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. तो लाभ SEBC च्या विद्यार्थ्यांना मिळावा.
वरील सर्व योजनांचा लाभ महाराष्ट्रात शिकत असलेल्या लाखो गरीब विद्यार्थ्यांना मिळावा अशा पद्धतीची मागणी प्रा. झोळ सर यांनी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रा. झोळ सर यांच्यामध्ये या सवलतींच्या योजनांबाबत विस्तारित चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लगेच तात्काळ संबंधित विभागाला सूचना देऊन हा विषय महत्त्वाचा असून उद्या सकाळी याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.