वडापुरीत गड किल्ले निर्मिती स्पर्धा वितरण समारंभ संपन्न…
वडापुरीत गड किल्ले निर्मिती स्पर्धा वितरण समारंभ संपन्न…
इंदापूर / विशेष प्रतिनिधी
इंदापूर: वडापुरी (ता. इंदापूर )येथे दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता आय चॅम्प अबॅकस अकॅडमी वडापुरी येथे दिवाळीनिमित्त दिवाळी सुट्टीत अकॅडमीतील विद्यार्थ्यांना कल्पकता विद्यार्थ्यांची संवर्धन गड-किल्ल्यांची या संकल्पनेनुसार गड किल्ले निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये सदर स्पर्धकांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व त्यांच्या गडकिल्ल्यांचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक: सिद्धी रवींद्र बर्गे. दुसरा क्रमांक: आर्या भागवत काटकर .
तिसरा क्रमांक: श्रीतेज शिवाजी भोसले.
उत्तेजनार्थ बक्षीस:
आदित्य ज्ञानेश्वर कोकरे,
भीमराज दादा पवळ.
पूर्वा नितीन नेवसे यांना ट्रॉफी, गुलाब पुष्प, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात तसेच प्रमुख मार्गदर्शन मल्लिकार्जुन वच्छे सर यांचे लाभले.
यावेळी वडापुरीचे माजी उपसरपंच भागवत काटकर, त्यांच्या पत्नी रेणुका काटकर तसेच आय कॅम्प अबॅकस अकॅडमीचे संचालक विशाल माने व माने मॅडम तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.