Breaking
ब्रेकिंग

जिल्हा परिषद -पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिंका ;    एकनाथजी शिंदे यांचे आवाहन 

0 7 9 9 5 4

जिल्हा परिषद -पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिंका ;    एकनाथजी शिंदे यांचे आवाहन 

करमाळा : विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी:-

दोन वेळा आमदार असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत आल्यामुळे करमाळा तालुक्यातील शिवसेना मजबूत झाली असून येणाऱ्या जिल्हा परिषद -पंचायत समिती नगरपालिकाआदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून करमाळा तालुक्यावर शिवसेनेचा भगवा फडकवा अशा सूचना  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिल्या .

यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे ,करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे सह करमाळ्यातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक ,मार्केट कमिटी व खरेदी विक्री संघाचे आजी-माजी संचालक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर आल्याने असताना माजी आमदार जयवंतराव जगताप ,जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे यांच्यासोबत करमाळा नगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली .
जयवंतराव जगताप हे सध्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे संचालक तसेच करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून
तालुक्यातील विविध सहकारी संस्थांवर त्यांचेअधिराज्य आहे .माजी आमदार जगताप प्रदीर्घ काळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व काही काळ उपाध्यक्षपदी कार्यरत होते .माजी आमदार कै . नामदेवराव जगताप यांना करमाळा तालुक्यात मानणारा मोठा मतदार असून जयवंतराव जगताप यांचे नेतृत्वाखाली रोज शेकडो पदाधिकारी शिवसेनेत सक्रिय होत आहेत .

यावेळी बोलताना माजी आमदार जगताप म्हणाले  की , दिलेला शब्द पाळणे ही जगताप गटाची संस्कृती असून करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेना मजबूत करणार असून येणाऱ्या सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवल्या जाणार आहेत .
लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पन्नास हजार शिवसैनिकांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेणार असून या मेळाव्यातून निवडणुकीचे रणसिंग फुंकणार आहे .माजी आमदार जगताप यांचेसह सांगोल्याचे माजी आमदार शहाजी ( बापू )पाटील, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे , यांच्या सहकार्यातून व पुढाकारातून जिल्ह्यातील काही आमदार व मातब्बर पदाधिकारी लवकरच शिवसेनेसोबत येणार आहेत .

करमाळा शहरातील विविध विकास कामासाठी 21 कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पत्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी दिले यावर उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश दिले आहेत .
याशिवाय करमाळा शहरातील रखडलेल्या भुयारी गटार योजना, अमृत टू नवीन पाणीपुरवठा योजना,
नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प ,रस्त्यांची कामे
या कामाचे प्रस्ताव तयार झाले असून त्याला सुद्धा मंजुरी देऊ असे आश्वासन दिले आहे .

तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण (आबा ) पाटील यांच्यासोबतच या पुढील सर्व निवडणुका लढविणे बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबतीत सकारात्मक असल्याचे यावेळी जयवंतराव जगताप यांनी सांगितले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे