Breaking
ब्रेकिंग

कायदेशीर लढ्या नंतर खुला झाला शेतकरी ता़ंदळी बांध

0 7 6 9 3 4

कायदेशीर लढ्या नंतर खुला झाला शेतकरी ता़ंदळी बांध

नगर /  प्रतिनिधी : शिवा म्हस्के

नगर तालुक्यातील दहिगाव या ठिकाणी तहसीलदार यांच्या लेखी आदेशानुसार तांदळी बांध नावांचा जुना वहिवाट रस्ता शेतकरी ताल झाड लावल्याने तो वहिवाट साठी बंद झाला होता दहिगाव येथील शेतकरी मंड्याबापु जरे यांनी नगर तहसीलदार यांच्या कडे रितसर अर्ज दाखल करुन तारीख वादी प्रतिवादी सुनावण्यात होऊन एक वर्षा नंतर सदर रस्ता वहिवाट साठी खुला करण्याचे लेखी आदेश दिले होते. प्रतिवादी यांना या निकाल विरुद्ध अपीला साठी ६० दिवसांचा कालावधी होता परंतु सदर निकाल विरुद्ध अपिल करण्यात आले नाही कारण सदर तक्रार योग्य पुरावे सह होती सदर सर्व शेतकऱ्यांना सदर गोष्टी कल्पना होती. रुईछत्तीसी मंडळ अधिकारी छाया सस्ते तसेच दहिगाव तलाठी गणेश घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वहिवाट रस्ता अडथळा दुर करून तो कायदेशीर कारवाई द्वारे खुला करण्यात आला या वेळी संबंधित शेतकरी वैयक्तिक खर्चा द्वारे ट्रॅक्टर व जेसीबी साह्याने दगड माती व्यवस्थीत करून सदर रस्ता वहिवाट साठी सुरू झाल्याने या रस्त्याचे दहिगाव मधील अनेक शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे. या रस्त्याचे ये- जा करण्यासाठी माल चारा वाहतूक करणाऱ्या साठी आता यांचा वापर पावसाळ्यात देखील करण्यात येईल तस हा खरं तर हा रस्ता खुप जुना रस्ता आहे. नगर तांदळी बांध नावाने तो प्रसिद्ध देखील आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी हा सदर रस्ता वहिवाट नावा खाली नामशेष केला होता‌. अनेक शेतकऱ्यांना यांचा मोठा त्रास होत होता सदर रस्ता खुला करण्याचीही कार्यवाही झाल्याने दहिगावातील शेतकरी समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या महसूल विभागाने सर्वाजनिक रस्ता खुला करण्यासाठी मोफत पोलिस बंदोबस्त निर्णय घेतला आहे.परंतु गावातील शेतकऱ्यांनी सदर रस्ता खुला करण्यासाठी आमची कोणतीही प्रकारची हरकत नाही समझोता मधून रस्ता खुला करण्यासाठी हरकत नाही ‌. त्या मुळे पोलिस बंदोबस्त मागविण्याची आवश्यकता भासली नाही‌. हे एक उत्तम उदाहरण दहिगाव येथे घडले आहे. शेतकरी आता सुज्ञ भुमिका व सुशिक्षित भुमिका मुळं नगर तालुका पोलिस यंत्रणेवर ताण येत नाही‌. दहिगाव मधील सामाजिक बांधिलकी अजून चांगली आहे. या वेळी रुईछत्तीसी म़ंडळ अधिकारी छाया सस्ते, कामगार तलाठी गणेश घुमरे ,माजी उपसरपंच महेश म्हस्के, शेतकरी मंड्याबापु जरे, छगन जरे, बाळकृष्ण काळभोर,पोपट पोटरे, रवींद्र म्हस्के, संगीता म्हस्के ,भाऊसाहेब मुळें, ग्रामपंचायत शिपाई रवीराज पोटरे, नारायण हिंगे, सुभाष पोटरे, हरिभाऊ हिंगे, प्रकाश हिंगे आदी शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते.

2.5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे