Breaking
ब्रेकिंग

नागापूर येथे जैन धर्म स्थानकाच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या उपस्थितीत होणार सोहळा संपन्न

0 8 6 5 1 5

नागापूर येथे जैन धर्म स्थानकाच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या उपस्थितीत होणार सोहळा संपन्न

अहिल्यानगर / एस डब्ल्यु न्यूज वार्ता

अहिल्यानगर : दि . ४ /   प.पु. आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा. यांच्या पावन आशिर्वादाने महाराष्ट्र प्रवर्तक प.पु. कुंदनऋषीजी म.सा. सरल स्वभावी प.पु. दिव्यदर्शनाजी म.सा. संस्कार दाता प.पु. सिद्धार्थमुनीजी म.सा यांच्या प्रेरणेने आणि अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर प.पू.श्री प्रवीणऋषीजी म.सा. यांच्या पावन सानिध्यात आणि जैन समाजाच्या सहयोगाने आणि आमदार श्री. संग्रामभैय्या जगताप , उपमहापौर श्री. धनंजय जाधव , महापौर सौ. ज्योतीताई गाडे यांच्या उपस्थितीत जैन धर्मस्थानक वास्तुचा भव्य लोकार्पण सोहळा दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता काकासाहेब म्हस्के शाळेसमोर आदर्शनगर नागापूर येथे होणार आहे .यावेळी व्याख्यान झाल्यावर भूमीदाता श्री. जवाहरलालजी रविलालजी राहुलजी रुपेशजी रोहितजी गुगळे परिवार द्वारा संपन्न होणार आहे. या शुभ प्रसंगी सर्व जैन समाज बांधवांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकां द्वारे आवाहन करण्यात आले आहे .

श्री संजय चोपडा,श्री विपूल शेटिया, श्री बाबुशेठ बोरा, श्री राजेश भंडारी ,श्री लिंबाशेठ नागरगोजे,श्री कुमार वाकळे, श्री नवनाथ कातोरे, श्री बाबासाहेब नागरगोजे श्री सागर बोरुडे,श्री अशोक बडे,श्री राजेश कातोरे, श्री दत्तात्रय सप्रे, सौ. आशाताई कातोरे, सौ. सुनिताताई भिंगारदिवे तसेच सर्व आजी माजी नगरसेवक विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील .
हॉटेल चैतन्य क्लासिक येथुन सकाळी ७ वाजता मिरवणुक निघणार आहे .कार्यक्रमानंतर गौतम प्रसादीचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सकल जैन श्रावक संघ यांनी केले आहे .
संपर्क:- 9423165030/9561199198/9921997271

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे