Breaking
ब्रेकिंग

बाल विद्यामंदिर शाळेमध्ये सर्पमित्र कृष्णकांत पोपळघट यांचे सर्पा बदल समज गैरसमज यावर व्याख्यान

0 7 6 9 4 1

बाल विद्यामंदिर शाळेमध्ये सर्पमित्र कृष्णकांत पोपळघट यांचे सर्पा बदल समज गैरसमज यावर व्याख्यान

विशेष प्रतिनिधी:- शिवाजी दवणे

निसर्गाचे संवर्धन जतन आणि निसर्ग साखळी समतोल राखणं महत्त्वाचं गरजेचे आहे. निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील एक घटक म्हणजे साप हा शब्द उच्चारला किंवा दिसला तरी कोणाच्याही मनामध्ये एकदम भीती बसते. नागपंचमी या सणाचे औचित्य साधून समाजातील सापा विषयी समज गैरसमज दूर करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहराच्या बाल विद्या मंदिर या शाळेमध्ये सर्पमित्र शकृष्णा रामदास पोपळघट यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले. साप हा निसर्गातील अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. अनेक साप हे विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार आहेत.परंतु शेतकरी सामान्य माणसाना या बदलची माहिती अभावी भीतीपोटी त्याला मारून टाकतात. वास्तविक पाहता साप शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या उंदराला खाऊन आपली उपजीविका करत असतो. तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्रच असतो. अनेकदा सापाच्या विषाचा उपयोग अनेक औषधांमध्ये देखील केला जातो. सापाच्या विषारी बिनविषारी अशा अनेक प्रजातीची माहिती कृष्णा पोपळघट यांनी दिली.साप दिसल्यास त्याला लगेच मारून न टाकता त्यांना सुरक्षितपणे जाण्याची संधी द्यावी किंवा सर्पमित्राला बोलवावे असे आवाहन राहुरी येथील सुप्रसिद्ध सर्प मित्र कृष्णा पोपळघट व श्री मुजीब देशमुख यांनी केले. सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी व सर्पदंश झाल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावे याविषयी ची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.बिन विषारी वाडा, धामण, तस्कर ,कवड्या, गवत्या, मांडूळ ,अजगर वेरूळ, कुकरी, रुका, तर विषारी असलेले नाग, मण्यार ,घोणस, पोवळा ,फुरसे, किंग कोब्रा या सापांविषयी ची माहिती ऐकून संपूर्ण पालक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय देताना संदीप रासकर यांनी कृष्णा पोपळघट हे गेली वीस वर्षापासून राहुरी शहर व परिसरातील मध्ये सर्पमित्र म्हणून मोठे योगदान देत आहे.यांचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमानंतर कृष्णा पोपळघट यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली. छोट्याशा मुलांनी त्यांना एका मोठ्या सेलिब्रिटी सारखे सन्मान दिला त्याबद्दल कृष्णा पोपळघट यांनी धन्यवाद आभार मानले. अध्यक्षस्थानी कै.लालशेठ बिहानी विद्या मंदिर प्रशालेचे माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक राहुल जगताप हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बाल विद्या मंदिर चे मुख्याध्यापक गुलाब मोरे सर, सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन शिवाजी कवडे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे