Breaking
ब्रेकिंग

निर्मलनगर प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमच्या भक्तीचे फळ - बंटी हिवाळे

0 8 6 5 1 0

निर्मलनगर प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमच्या भक्तीचे फळ – बंटी हिवाळे

प्रतिनिधी : संवेद वायकर

निर्मलनगर प्रतिष्ठान आयोजित शारदीय नवरात्र उत्सव यंदा उत्साहात व भक्तिभावात पार पडला. यंदा १८ वे वर्ष साजरे करताना मंडळाने घटस्थापना व देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्र उत्सवाची सुरुवात केली. रोज महिलांसाठी,लहान मुलांसाठी तसेच भाविकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.

दररोज रात्री देवीची महाआरती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,धार्मिक क्षेत्रातील मंडळी,डॉक्टर्स,महिला बचत गट,पत्रकार,तरुण मंडळ पदाधिकारी,विविध संस्थांचे पदाधिकारी,देणगीदार यांचे शुभहस्ते करण्यात आली.
भाविकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व दांडिया नृत्य महोत्सव असे आकर्षक कार्यक्रम घेण्यात आले . महिलांच्या प्रचंड सहभागासह दांडिया नृत्य हे उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.

या प्रसंगी नियोजीत पावन गणपती मंदिराच्या लवकरच सुरू होणाऱ्या पंचक्रोशीतील सर्वांत सुंदर अशा मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने सर्वातोपरी मदत करावी, असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री .अजय उर्फ बंटी हिवाळे यांनी केले.

निर्मलनगर प्रतिष्ठानला लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार श्री . संग्रामभैय्या जगताप आणि श्री .अक्षय दादा कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले.

उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष बंटी हिवाळे, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल, चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी , जावेद इनामदार, साजिद इनामदार , सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर ,वर्षा गवळी आदी महिला, सर्व सभासद व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे