Breaking
ब्रेकिंग

*मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे शेटफळ येथे अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसणार; विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये:- सरपंच पांडुरंग लबडे*

0 3 2 1 4 2

*मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे शेटफळ येथे अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसणार; विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये:- सरपंच पांडुरंग लबडे*

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/ करमाळा तालुक्यातील शेटफळ भागासह उजनी बॅक वॉटर व संपूर्ण करमाळा तालुक्यातील वीज समस्येबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्याकडे (वाढीव) ट्रान्सफर्मर व नवीन सब स्टेशन उभारणीसाठी मंजुरी मिळावी यासाठीचे पत्र जून २०२४ मध्ये दिलेले होते. संबंधित पत्रामध्ये त्यांनी विजेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने सध्या ३३/११ KV सबस्टेशन कार्यरत असलेल्या सबस्टेशन मध्ये वाढीव ५ MVA ट्रान्सफर्मर बसविणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. मा. आ. शिंदे यांच्या संबंधित पत्रानुसार कोळगाव, झरे, केम, वीट, उमरड, कविटगाव, शेटफळ व करमाळा शहर या ठिकाणी ५ MVA चे वाढीव ट्रान्सफर्मर मंजूर झाले असून त्याचे संपूर्ण श्रेय मा. आ. संजयमामा शिंदे यांचे आहे. विरोधकांनी शेटफळ येथील ट्रांसफार्मर चे फुकटचे श्रेय घेऊ नये असे आवाहन शेटफळ चे सरपंच पांडुरंग लबडे यांनी केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, शेटफळ गावामध्ये मा. आ. संजयमामा शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. पाच एम व्ही एस ट्रान्सफॉर्मर चे साहित्य पंधरा दिवसापूर्वी आलेले आहे. सर्वच कामांचे एकत्रित उद्घाटन करण्यासाठी आम्ही थांबलेलो असतानाच विरोधकांनी संबंधित ट्रांसफार्मर चे उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले. जर तो ट्रांसफार्मर त्यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असेल तर त्याचा पुरावा त्यांनी सादर करावा. विनाकारण संजयमामा शिंदे यांच्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नये असा टोलाही श्री. लबडे यांनी लगावला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे