Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस लाईन गणपती चे टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन*

0 7 6 9 4 3

*राहुरी पोलीस लाईन गणपती चे टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन*

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस लाईन दत्त मंदिर येथील दत्त मंदिरात पोलीस लाईन येथे राहणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या मुलांनी गणेश स्थापना केली होती सदर गणेशाची दिनांक 3 9 2025 रोजी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन केले सदरची मिरवणूक आकर्षक ठरली अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे सदर मिरवणुकी करता राहुरी तालुक्यातील 1)संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था वांबोरी ह भ प किशोर महाराज गडाख 2)ईश्वर महाराज शास्त्री ज्ञानई वारकरी शिक्षण संस्था वांबोरी 3)संत कवी महिपती महाराज वारकरी संस्था ताहाराबाद हभप अर्जुन महाराज तनपुरे 4) विठ्ठल वारकरी संस्था , वांबोरी ह भ प आदिनाथ महाराज दुशिंग वारकरी शिक्षण संस्था उंबरे 5) चैतन्य वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी आखाडा हभप गोपीनाथ महाराज वरपे
अशा पाच वारकरी संस्थाचे
200 ते 250 विद्यार्थ्यांचे सहभागात मृदंगाच्या गजरात राहुरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती . सदरची मिरवणूक 4/00 वाजता सुरू होऊन 8/00 वाजता संपली . सदर मिरवणुकीस शहरातील गजानन मित्र मंडळ, व्यंकटेश गणेश मंडळ, बुवा सिंद बाबा मित्रमंडळ , वाल्मिक मित्र मंडळ , छत्रपती तरुण मंडळ , पावन गणेश मंडळ, श्री रामदत्त मित्र मंडळ , गौतम मित्र मंडळ , व्यापारी असोशियन यांनी भेट देऊन चहा – पाणी ,फराळ देत मिरवणुकीचे स्वागत केले . सदर मिरवणुकी करता निमसे पाटील टाकळीमिया यांनी रथ उपलब्ध करून दिला, निवेदक बापू तनपुरे व सुदेश बोरुडे , गणेश वाघ पोपट शिंदे,यांचे विशेष सहकार्य लाभले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे