Breaking
ब्रेकिंग

एमआयडीसी पोलिसांतर्फे ‘रायझिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा

0 3 9 0 5 0

एमआयडीसी पोलिसांतर्फे ‘रायझिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा

नगर / विशेष प्रतिनिधी : रफिक शेख

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलांतर्गत एमआयडीसी पोलिसांतर्फे ‘रायझिंग डे’ गुरुवारी (दि. २) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील कामकाजा विषयी अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात देहरे ( ता. नगर ) येथील नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ११ वी चे विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्य पोलीस दलातर्फे रायझिंग डे हा उपक्रम राबविला जातो. २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी या दिवशी राज्य पोलीस दलास ध्वज प्रदान केला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी ध्वजसप्ताह साजरा केला जातो. याअंतर्गत आयोजित कार्यक्रमात नवभारत विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी स. पो. नि. चौधरी यांनी पोलीस ठाण्यातील कामकाज, तसेच कायदा सुव्यवस्था, तसेच दलाकडील शस्त्रास्त्रांची माहिती दिली. ठाणे हद्दीतील
नागरिकांशी चर्चा,करून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन पोलिसांचा जनतेशी असणारा संपर्क वाढावा, तो अधिक वृिद्धगत व्हावा या उद्देशाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

यावेळी स.पो. नि. माणिक चौधरी, पो. उप. नि. विकास जाधव, पो. उप. नि. मनोज मोंढे, पो. उप. नि. विनोद परदेशी, पो. ह. भास्कर मिसाळ, पो. ह. विशाल थोरात, पो. ह. चौधरी, पो. ह. उगलमुले, पो. कॉ. सुरज देशमुख, पो. कॉ. शितल बेंद्रे, पो. कॉ. सोनाली जाधव, देहरेचे पो. पा. खजिनदार, शिक्षक कुमार दळवी, विनीत कांडेकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे