Breaking
ब्रेकिंग

गरीब कुटुंबातील ८५० ग्रॅमच्या नवजात अर्भकाला जीवनदान

0 4 3 3 2 5

गरीब कुटुंबातील ८५० ग्रॅमच्या नवजात अर्भकाला जीवनदान

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- बालरोगतज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांचा असामान्य करिष्मा अमळनेर-पोट भरण्यासाठी शहरात आलेल्या गरीब कुटुंबातील ८५० ग्रॅमच्या नवजात अर्भकाला अंमळनेरमध्ये जीवनदान मिळाले असून बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी असामान्य करिष्मा दाखविल्याने हे जीवनदान मिळाले आहे.
लातूर येथील रहिवासी राजुसिंग राजपूत हे अंमळनेर येथे अंबिका मंगलकार्यालया समोर टेन्ट लावून आयुर्वेदिक औषध विक्री व्यवसाय करतात. त्यांच्या पत्नीने अलीकडेच एका अतिअल्प वजनाच्या नवजात अर्भकाला डॉ. भूषण यांच्या दवाखान्यात जन्म दिला. बाळाचे वजन अवघे ८५० ग्रॅम असल्याने बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. बाळ वाचण्याची शक्यता कमी असल्याचे दिसताच तातडीने कस्तुरबा बालरुग्णालय, अंमळनेर येथे डॉ. शरद बाविस्कर यांच्याकडे त्या रात्री दाखल करण्यात आले. बाळाची स्थिती पाहून सर्वांनी मोठ्या शहरात न्यावे असा सल्ला दिला. मात्र, परिस्थिती जेमतेम असल्याने लाखो रुपयांचा खर्च करणे शक्य नव्हते. त्यावेळी बाळाचे वडील तातडीने बाळाला कस्तुरबा बालरुग्णालय, अंमळनेर येथे घेऊन गेले. अत्यंत धास्तावलेल्या वडिलांनी डॉक्टरांना आपली आर्थिक व आहेत.
कौटुंबिक परिस्थिती सांगितली. यावर डॉ. बाविस्कर यांनी धीर देत, ‘मी पूर्ण प्रयत्न करतो, असे सांगत बाळाच्या जीवासाठी तातडीने उपचार सुरू केले. त्यांनी अत्याधुनिक छखउण (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये बाळाला ठेवून, ऑक्सिजन, अँटीबायोटिक्स, विशेष पोषणद्रव्ये आणि सतत २४ तास वैद्यकीय देखरेख केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली आणि आज बाळाचे वजन १३५० ग्रॅम झाल्याची आन ददायक बातमी आईवडिलांना मिळाली .
दरम्यान डॉ. बाविस्कर हे बालरोग व नवजात अर्भक तज्ञ म्हणून १९ वर्षांहून अधिक अनुभवाचे धनी आहेत. त्यांनी आतापर्यंत अतिशय गंभीर स्थितीतील हजारो पेक्षा अधिक नवजात अर्भकांचे यशस्वी उपचार केले आहेत. जीवनदान मिळालेल्या बाळाचे पालक, नातेवाईक, व गावकऱ्यांनी डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे