Breaking
ब्रेकिंग

जि.प.मराठी शाळा लौकी ता.शिरपूर येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन 

0 3 9 0 7 2

जि.प.मराठी शाळा लौकी ता.शिरपूर येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन 

प्रतिनिधी :- पंकज पाटील

शिरपूर :-आज दि. ९/१/२०५५  रोजी जि.प.मराठी शाळा लौकी ता.शिरपूर येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन सरपंच प्रतिनिधी श्री पिंटू भाऊ भिल यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी SMC अध्यक्ष श्री अरुण भाऊ बंजारा होते. मुख्याध्यापक आदरणीय श्री देवेंद्र बागुल सर, शासकीय आश्रम शाळा लौकीचे मुख्याध्यापक आदरणीय गोपाल जी सैंदाणे, माध्यमिक शिक्षक श्री गोपाल जमादार सर , श्री बडगुजर सर, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, मुख्याध्यापिका श्रीमती नंदा पाटील मॅडम, तसेच सर्व शिक्षक वृंद , विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनीच 20 स्टॉल लावले होते.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा अनुभव घेतला. सर्व 20 स्टॉलची एकूण विक्री 2850 झाली. आश्रम शाळा लौकीचे मुख्याध्यापक श्री गोपाल सैंदाणे सर, चंपालाल पाटील गुरुजी यांनी बाल आनंद मेळावा बाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका नंदा पाटील मॅडम तर सूत्रसंचालन श्री नंदलालजी धनगर व आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली ठाकूर यांनी केले. बाल आनंद मेळावा मांडणी श्रीमती जयश्री सावळे तसेच सुशोभन श्रीमती संगीता सोनवणे व श्री पवन पाटील यांनी केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे