Breaking
ब्रेकिंग

जो काळ मला मिळाला त्या काळामध्ये पायाभूत विकास करण्याचे काम मी केले असून यापुढे करमाळा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून चेहरा मोहरा मला बदलायचा आहे:- आमदार संजयमामा शिंदे

0 3 9 0 2 0

जो काळ मला मिळाला त्या काळामध्ये पायाभूत विकास करण्याचे काम मी केले असून यापुढे करमाळा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून चेहरा मोहरा मला बदलायचा आहे:- आमदार संजयमामा शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६/ विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये 2019 ते 24 मध्ये मी माझ्या परीने योगदान दिले. सर्वच विकास कामे पूर्ण झाली असं नाही परंतु जो काळ मला मिळाला त्या काळामध्ये पायाभूत विकास करण्याचे काम मी केले असून इथून पुढच्या काळामध्ये तालुक्याला औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ओळख निर्माण करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणे हे आपले उद्दिष्ट आहे असे आमदार संजयमामा शिंदे यांच्या जाहीरनाम्यामधून स्पष्ट होत आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार आमदार संजयमामा यांनी जाहीरनाम्यात करमाळा शहराच्या हद्दवाढीसह नवीन विकास आराखडा, शेती, वीज, आरोग्य व शिक्षण या घटकावर भर दिला आहे. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र सुरु करणे व कृषी महाविद्यालय सुरु करण्याचा मानस आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. करमाळ्यातील ११८ व माढा तालुक्यातील ३६ गावांमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. ‘२०१९ ते २४ दरम्यान केलेल्या विकास कामांमुळे माझ्यावर मतदारांचा विश्वास आहे. नेते एका बाजूला आणि मतदार एका बाजूला अशी स्थिती असून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे असे आमदार शिंदे यांनी एका सभेत स्पष्ट केले आहे.

करमाळ्यातील मतदाराच्या विश्वासास पात्र राहून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून मी करमाळ्याला निधी देतो आहे. विकास काम करताना कधीही राजकारण केले नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी काम केले आहे. तो विरोधक असो की माझा. विकास कामात मी कधीच राजकारण केले नाही असे ते म्हणाले. येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये आ. शिंदेचे पुढील गोष्टींना प्राधान्य राहील

१) कुकडी उजनी योजना सुरु करण्यासाठी काम प्रयत्न करणार असून या माध्यमातून ४० गावातील २४ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणणार आहे.
२) दहिगाव उपसा सिंचन योजने चे काम बंद नलीकेतून होत आहे. त्यामुळे बचत होणाऱ्या पाण्यातून नवीन समाविष्ट करण्यासाठी १२ गावांचा सर्व्हे करून बंद नलिकेतून पाणी देण्यावर भर राहणार
३) मराठवाड्याला पाणी जाणाऱ्या बोगद्याच्या ९ शॉफ्टद्वारे पाणी उचलण्याची परवानगी मिळवण्यावर भर देणार
४) सीना माढा उपसासिंचन योजनेचे पाणी बेंद ओढ्यात सोडले जाणार
५) सौन्देत १३२ केव्ही वीज उपकेंद्र उभारणार व सावडीत ७६५ केव्ही वीज उपकेंद्र उभारणार
६) करमाळा शहरात नवीन पाणी पुरवठा योजना केली जाणार. नवीन विकास आराखडा तयार केला जाणार व विस्तारीकरण केले जाणार.
७) मांगी एमआयडीसी येथे पाणी पुरवठा योजना सुरु करणे व येथे नामांकित कंपन्या आणून रोजगार निर्मिती केली जाणार.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे