गुंडेगाव येथे सामाजिक अंकेक्षण कार्यशाळेचे आयोजन…

गुंडेगाव येथे सामाजिक अंकेक्षण कार्यशाळेचे आयोजन…
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
नगर तालुक्यातील ग्रामपंचयात कार्यालय गुंडेगाव मधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२४-२५ अंतर्गत झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्या करिता सामाजिक अंकेक्षण ग्रामसाधन व्यक्ती ( VRP )पुजा किरण ठोंबे यांनी गुंडेगावामध्ये नुकतीच मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी दि. १८/०८/२०२५ ते दि २५/४/२०२५ या कालावधी दरम्यान आपल्या ग्राम पंचायत चे सामाजिक अंकेक्षण शासनाकडून आयोजित आहे.यामध्ये रोजगार दिवस साजरा करणे,गाय गोठ्यावर नाव टाकणे, फळबाग लागवड फलक लावणे, अपूर्ण घरकुल पूर्ण करणे,ग्राम साधन व्यक्ती यांच्याकडून करण्यात येत आहे त्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित करुन नोटीस काढावी तसेच सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी आदेशातील प्रपत्र ई नुसार सर्व लेखे दस्ताऐवज तपासणी करिता साधन व्यक्ती यांच्याकडे २ दिवसात देण्यात यावे व त्याची पोच पावती त्याच्याकडून घ्यावी तसेच विशेष ग्रामसभा अहवाल सत्यप्रत करून ग्राम साधन व्यक्ती यांच्या कडे ग्रामसभा संपल्या नंतर त्याच दिवशी ४ सत्यप्रतीत सुपूर्द करण्याचे आदेश यामध्ये आहेत.

यावेळी उपस्थितांमध्ये सरपंच मंगलताई सकट, उपसरपंच नानासाहेब हराळ,ग्रामपंचायत सरपंच संजय कोतकर, भाऊसाहेब हराळ, ग्रामसेवक माणिक होनकर्पे,ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब कोतकर, ग्रामपंचायत कर्मचारी शहाजी भापकर,अमोल गाढे,रामकृष्ण कुताळ, संतोष हराळ, सुरेश भापकर, राहुल चव्हाण, तुषार कपिले,राजू कपिले, सचिन कुताळ,बाळासाहेब माने,केशव हराळ, विजय माने,अतुल भोसले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..




