फार्मसी महाविद्यालयात मुलाखतुन २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली*
बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील ०९ व एम एस सी च्या १२ विद्यार्थ्यांना Quality Control, Production अशा विभागात काम करण्याची संधी मिळणार*

*फार्मसी महाविद्यालयात मुलाखतुन २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली*
*बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील ०९ व एम एस सी च्या १२ विद्यार्थ्यांना Quality Control, Production अशा विभागात काम करण्याची संधी मिळणार*
*कंपनी तर्फे निवड झाल्याबद्दल विद्यार्थांना पत्र देण्यात आले*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित,प्रताप काॅलेज (स्वायत्त) आणि स्व.पंढरीनाथ
छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती योजनेंतर्गत महाविद्यालयीन स्थरावर MACLEODS PHARMA LTD या नामांकित औषधी कंपनी तर्फे Quality Assurance, Quality Control and Production इत्यादी विभागात पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी दि. १५.०५.२०२५ रोजी Macleods Pharma Ltd कंपनीतर्फे श्री हिरेन पटेल व श्री.राणा यांचे उपस्थितीत फार्मसी महाविद्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती साठी सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यातून चाळणी पध्दतीने अंतिम फेरीत सुमारे २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, यात प्रामुख्याने बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील ०९ व एम एस सी च्या १२ विद्यार्थ्यांना Quality Control, Production अशा विभागात काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना कंपनी तर्फे निवड झाल्याबद्दल चे पत्र देण्यात आले.
सदर मुलाखतीचा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी फार्मसी महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.गीतांजली पाटील,प्रा.रविन्द्र माळी व तसेच प्रताप महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा.डाॅ. निलेश पवार, प्रा.डाॅ. अमोल मानके, प्रा.डाॅ.किरण सुर्यवंशी, प्रा.हेमलता सुर्यवंशी सोबत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पदवी अभ्यासक्रमातील सर्व निवडक विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे.