पुन्हा मानसिक विकृतीचा बळी ठरली निरागस लेक
पुन्हा मानसिक विकृतीचा बळी ठरली निरागस लेक
प्रतिनिधी : सोनाली मोरे
नाशिक जिल्ह्यातील सर्वांना हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सकाळभर खेळत धावत असलेली अवघ्या ३ वर्षांची चिमुकली यज्ञा दुपारी अचानक गायब झाली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता तिचा मृतदेह अत्यंत अमानुष व विचित्र अवस्थेत आढळला.
आई-वडिलांची लाडकी लेक… सर्वसामान्य कुटुंबातील बाप आपल्या लेकरासाठी स्वप्नांचा संसार उभा करत होता. परंतु नियतीने हातातून हे सुख निर्दयीपणे हिरावून नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या तोंडावर दगड घालून तिची निर्दयतेने हत्या केली. समाजाला लाज आणणारी ही घटना ऐकून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
❗समाजाला हादरवणारा प्रश्न
🔹 तीन वर्षांच्या निष्पाप बाळाकडे पाहूनही असा दुष्ट विचार कोणाच्या मनात येऊ शकतो?
🔹 अशा कृत्याकर्त्यांना निरागस लेकरांच्या आई-वडिलांच्या वेदनेची जाणीव नसते का?आज त्या आई-वडिलांच्या घरात, जिथे कालपर्यंत खेळण्यांच्या किणकिणाटाने वातावरण भारावले असायचे, तिथे आज स्मशानासारखी शांतता पसरली आहे .
💢 कठोर शिक्षेची मागणी
स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून आरोपीला त्वरित व कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
लोकभावना अशी आहे की— न्यायालयीन चौकटीत न अडकता, असा नराधम भर चौकात उभा करून त्याला वेदनादायी मृत्यू दिला जावा, जेणेकरून समाजात पुन्हा कोणीही असा अपराध करण्यापूर्वी हजार वेळा विचार करेल.
न्याय व्यवस्थेच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी सांगितले—
> छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा अमानुष कृत्यांना तात्काळ शिक्षा दिली जात होती! आजही तसाच न्याय यज्ञा बालिकेला मिळावा .या अमानुष कृत्याचा सर्वत्र निषेध होत असून समाजात संताप व्यक्त केला जात आहे.



