Breaking
ब्रेकिंग

यशवंत संजयमामा शिंदे यांचे नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक; ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेत सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडीत १२५ पैकी ११२ गुणांची विक्रम

0 8 9 8 6 3

यशवंत संजयमामा शिंदे यांचे नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक; ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेत सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडीत १२५ पैकी ११२ गुणांची विक्रम

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०४/ निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा शिंदे यांनी नेमबाजी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२६ (शॉटगन) या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

सदर स्पर्धा दि. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून श्री. यशवंत शिंदे यांनी आपल्या नेमबाजी कौशल्याची आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे.

या स्पर्धेतील त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रम मोडीत काढत १२५ पैकी तब्बल ११२ गुण मिळवले. या विक्रमी कामगिरीमुळे त्यांनी रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले असून, सुवर्णपदकावरही आपली मोहोर उमटवली आहे. राज्यस्तरावर अशी ऐतिहासिक कामगिरी करणारे श्री. यशवंत शिंदे हे निमगाव (टें) सह माढा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहेत.

या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ मुंबई उपनगर जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अशोक पंडित, उपाध्यक्ष श्री. रमेश कुसळे आणि जनरल सेक्रेटरी श्रीमती शीला कानुंनगो व तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेते श्री. यशवंत शिंदे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

श्री. यशवंत शिंदे हे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांचे सुपुत्र आहेत. राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे निमगाव (टें.), माढा तालुका तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील क्रीडा वाटचालीसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

निमगावच्या मातीतून राज्यस्तरावर सुवर्णझेप! सुवर्णपदकासह विक्रमाची नोंद करणाऱ्या श्री. यशवंत शिंदे यांच्या या देदीप्यमान यशाने तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे