Breaking
ब्रेकिंग

शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या वाहनाला दंड केल्याने आमदारांची आरटीओ कार्यालयात धडक

अवैध वाळू व मुरूम वाहतुकीवर त्वरित कारवाई करा - आ.हेमंत ओगले

0 3 9 0 2 1

शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या वाहनाला दंड केल्याने आमदारांची आरटीओ कार्यालयात धडक

अवैध वाळू व मुरूम वाहतुकीवर त्वरित कारवाई करा – आ.हेमंत ओगले

राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या प्रोडूसर कंपनीच्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नावाखाली सोयाबीनची गाडी पकडून ३५ हजार रुपयांचा दंड केला ही बातमी कानावर येताच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरटीओ कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि जी तत्परता शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना दाखवली त्याबद्दल उपस्थित त्यांनी गांधीगिरी करत आरटीओ अधिकाऱ्यांचा सत्कार करत गांधीगिरी केली.
यावेळी आमदार ओगले म्हणाले की, एकीकडे सर्रासपणे अवैध वाळू, मुरूम वाहतूक सुरू असून त्याच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात आणि गोरगरीब शेतकरी व हातावरच्या नागरिकांना त्रास देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता ही गोष्ट मी खपवून घेणार नाही. तातडीने अवैध पद्धतीने वाळू व मुरमांच्या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करा. जोपर्यंत फार्मर प्रोडूसर कंपनीने घेतलेला माल गोदामा पर्यंत जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदल्याची प्रक्रिया चालू होत नाही, असे असताना देखील जाणीवपूर्वक जर शेतकऱ्यांना त्रास दिला तर ते खपवून घेणार नाही. अवैधरित्या वाळू व मुरूम वाहतुकीच्या माध्यमातून पैसे कमविणे व त्यातून गुंडगिरी करणे अशा प्रवृत्तींकडे देखील प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशा सूचना आमदार ओगले यांनी दिल्या
यावेळी करण ससाणे म्हणाले की जी तत्परता शेतकरी कंपनीच्या वाहनाला दाखवली तर तीच तत्परता आपण विना नंबर असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्या ओव्हरलोड वाळूच्या गाड्यांवर दाखवणार का ? असा सवाल उपस्थित केला.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यातील नदीभागातून अनेक ठिकाणाहून ओव्हरलोड वाळूचे ढंपर चालतात त्याच्याकडे काना डोळा केला जातो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्याच वाहनावर कारवाई का होते, सरकारी अधिकाऱ्यांचेच याच्यामध्ये कुठे साथ-गाठ तर नाही ना ? अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत असल्याचे म्हटले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, माजी नगरसेवक आशिष धनवटे, पंडितमामा बोंबले,अशोक उपाध्ये, कलीम कुरेशी, सोमनाथ गांगड, रियाजखान पठाण, प्रवीण नवले, संतोष परदेशी, जावेदभाई शेख, संजय गोसावी, रितेश एडके, सुनील साबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश चव्हाणके, दादा माकोने, अमोल शेटे, रवी गायकवाड, सुरेश बनसोडे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, दीपक वमने वैभव कुऱ्हे, सनी मंडलिक, श्रेयस रोटे, राजेश जोंधळे, रितेश गिरमे, गोपाल भोसले, तीर्थराज नवले, योगेश गायकवाड सागर दुपाटी यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे