Breaking
ब्रेकिंग

महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

0 7 9 8 0 5

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 2 ते 6 जून, 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
प्रशिक्षणामध्ये आंब्यापासून विविध पदार्थ निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना भविष्यात आपला उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती ज्यामध्ये आंबा गर साठवणे, कैरी लोणचे व पन्हे, आंबा सरबत, सिरप, स्क्वॅश, आंबा पावडर, आमचूर, जॅम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षितता व मानके कायद्याची माहिती, प्रक्रिया उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, पदार्थांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, अनुदान यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी दि. 28 मे, 2026 पर्यंत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या कार्यालयाशी (02426) 243259 तसेच कार्यालय प्रतिनिधी श्री. राहुल घुगे 9421437698 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 8 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे