Breaking
ब्रेकिंग

ट्रैफिक जाम करणा-या अलिबाग एस.टी.स्टॅंड समोरील दुभाजकांची लांबी कमी करा

कॉंग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष समीर मधुकर ठाकूर यांची मागणी

0 3 9 0 4 0

ट्रैफिक जाम करणा-या अलिबाग एस.टी.स्टॅंड समोरील दुभाजकांची लांबी कमी करा

कॉंग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष समीर मधुकर ठाकूर यांची मागणी.

अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे

अलिबाग – अलिबाग एस.टी.स्टॅंड व आय.डी.बी.आय. बॅंकेसमोरील रस्ता दुभाजक खूपच लांबीचे असल्याने अलिबाग बसस्थानकातून बाहेर पडणा-या तसेच अलिबाग बसस्थानकामध्ये येणा-या बसेसना वळसा घेताना त्रास होवून या मार्गावर नेहमी वाहतुक कोंडी होत असते. यामुळे वाहतुक कोंडीस कारणीभूत ठरणारे अलिबाग एस.टी.स्टॅंड समोरील दुभाजकांची लांबी कमी करण्याची मागणी कॉंग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष समीर मधुकर ठाकूर यांनी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
या दुभाजकांच्या लांबी मुळे अलिबाग एस.टी.स्टॅंड जवळ नेहमीच वाहतुक कोंडी होत असते. यामार्गावर अनेकदा छोटे मोठे अपघात झालेले आहेत. अलिबाग शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांनाही या वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्ते दुभाजकांची लांबी कमी केल्यास या भागातील वाहतूक कोंडी फुटून वाहतुक सुरळीत होणार असल्याने अलिबाग एसटी स्टॅंड जवळील तसेच आय.डी.बी.आय बॅंकेसमोरील दुभाजकाची लांबी त्वरीत कमी करण्याची मागणी कॉंग्रेसचे अलिबाग षहर अध्यक्ष समीर मधुकर ठाकूर यांनी केली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे