Breaking
ब्रेकिंग

जुन्या आठवणींना उजाळा देत श्री चांगदेव विद्यालय येथे दहावीच्या २००५ बॅचचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न …

0 7 6 9 3 2

जुन्या आठवणींना उजाळा देत श्री चांगदेव विद्यालय येथे दहावीच्या २००५ बॅचचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न 

नारायणडोहो / प्रतिनिधी : रफिक शेख

शालेय जीवन म्हणजे मस्ती, धिंगाणा, थोडी शिस्त, आणि अंजानपणा असतो. आपण जिथे जन्मलोत तिथल्या परिसराशी एक अतूट बंधन जडलेले असते. त्यातही प्राथमिक शिक्षण झालेली शाळा, तिथले मित्र – मैत्रिणी, गुरुजन आणि त्यांच्या सहवासातील आठवणी अविस्मरणीय असतात. प्राथमिक शिक्षण संपवून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने जातात, काहींचं शिक्षण मधेच थांबून लग्नही झालेली असतात. गृहस्थ जीवन जगत असताना जणूकाही आपण आपले बालपण हरवून गेलेले अस्तोत, आणि आज वयाची चाळीस वर्ष पार केलेली पिढी पुन्हा बालपण शोधण्याचा प्रयत्न करते. असेच बालसवंगड्याच्या भेटीसाठी आज श्री चांगदेव विद्यालयाचे शिक्षक येथे २००४ ते २००५ दहावीच्या बॅचचे ‘गेट टुगेदर’ संपन्न झाले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ यांनी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेत अनेक गोर – गरिबांची मुले शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचली आहेत, कुणी शिक्षक, प्राध्यापक, वकील, जज, डॉक्टर, पायलट, इंजिनिअर, पोलिस, सैनिक, पत्रकार, उद्योजक अशा प्रत्येक क्षेत्रात अलौकिक कर्तृत्त्व या शाळेतील विद्यार्थी गाजवत आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री. सुनिल म्हस्के सर उपस्थित होते. त्यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकून समाधान व्यक्त केले. एकमेकांच्या भेटीच्या ओढीने जवळपास ६० माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी एकत्र आले.
तसेच त्या बॅचला शिकवणारे शिक्षकही उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्री. इंग्रजी विषय विजय साठे सर, गणित विषय मनोरंजक करणारे श्री. दगडे सर,इंग्रजी विषयाचे सौ.भिंगारदिवे मॅडम, श्री. अशोक म्हस्के सर, श्री. घुंगार्डे सर, श्री. नारळे सर, विज्ञान मॅडम श्रीमती. लाटे मॅडम असे सर्व शिक्षक उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांनी भरभरून मन मोकळे केले.
आपापल्या संसारात रममाण झालेल्या मित्र – मैत्रिणींनी मोकळेपणाने वीस वर्षानंतर गप्पा मारल्या. हा भेटीचा योग म्हणजे वीस वर्षानंतरची गाठ – भेट होती.यात प्रामुख्याने प अरुण सायंबर, प्रशांत शिंदे,नरेंद्र साठे, बाप्पू म्हस्के, बाळासाहेब गंगार्डे, विजय साठे, दत्ता चिरके, कैलास लोखंडे, कानिप अंकुश, महेश कराळे, आदाम शेख, गणेश बनकर, जयदीप म्हस्के,प्रदीप म्हस्के, नितीन बेरड, दादासाहेब फुंदे,गणेश म्हस्के,चांगदेव लांडगे, सागर कांबळे,उद्धव तिपुळे,कैलास साठे या मुलांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सर्व सहकार्य केले, तर मुलींमध्ये रुपाली डेरे, सविता कराळे कामिनी साठे, अंबिका फुंदे, मनीषा म्हस्के,मंगल शिंदे, वैशाली साठे,वृषाली खडके, जयश्री तिपुळे,सविता उकिर्डे, अनिता धराडे

मुलींनीही सहकार्य करून जुन्या आठवणींना उजाळा दिला .

 शाळेच्या विकासासाठी आपापल्या परीने योगदान देण्याचे संकल्पही करण्यात आले.

शेवटी म्हणावेसे वाटते,
” आजही आठवते मज
माझी ही शाळा,
ज्या शाळेने फुलवला
हरक्षेत्राचा मळा…”

जुन्या साऱ्या स्मृती
पुन्हा उसळून आल्या,
सवंगड्यांच्या भेटीत
गप्पा जुन्या रंगल्या…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे