UGC Net परीक्षा मध्ये कु.अनुष्का बाबासाहेब शेलार उत्तीर्ण

UGC Net परीक्षा मध्ये कु.अनुष्का बाबासाहेब शेलार उत्तीर्ण
राहुरी तालुका जावेद शेख
भारत सरकारच्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) तर्फे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात येणारी UGC नेट परीक्षा कुमारी अनुष्का बाबासाहेब शेलार यांनी उत्तीर्ण होऊन प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली आहे.
अनुष्का यांनी महाराष्ट्रातील नामांकित व सर्वांत जुन्या विधी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या आय.एल.एस. लॉ कॉलेज पुणे मधून एल .एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले असून, भारतातील अग्रगण्य असलेले नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, संभाजीनगर मधून एल.एल.एम. पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली आहे.
भारत सरकारतर्फे त्यांची कर्नाटक उच्च न्यायालय, बंगळुरू येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. तसेच त्यांनी अहिल्यानगर न्यायालयातही इंटर्नशिप पूर्ण केली आहे. सध्या त्या विधी सेवा अधिकारी पदासाठी तयारी करीत आहेत.
कु.अनुष्का शेलार या महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त श्री. बाबासाहेब शेलार व सौ. स्मिता बाबासाहेब शेलार यांच्या कन्या व सामाजिक कार्यकर्ते श्री. रविंद्र शेलार यांच्या भगिनीं आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


