मायंबाला गुढीपाडवा उत्सवात महाप्रसाद संपन्न

मायंबाला गुढीपाडवा उत्सवात महाप्रसाद संपन्न
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
नगर-मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी असलेल्या सावरगांव येथील गर्भगिरी डोंगरावर मायंबा येथे गुढीपाडवा उत्सवात नगर मधील जूनाबाजार मध्ये असलेल्या पुरातन श्री नाथ महाराज समाधी मंदिर तसेच श्री सद्गुरू शंकर महाराज मठाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा लाभ सुमारे ६००० कावडी धारक व भाविकांनी घेतला .
गुढीपाडवा महापुजा उत्सवात फाल्गुन अमावस्येला सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत संतोषनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कावडी घेऊन येणाऱ्या नाथभक्तासाठी व भाविकासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यादिवशी नाथांच्या समाधीवर कावडीच्या गंगाजलाने जलाभिषेक करण्यात येतो व गुढीपाडव्याच्या पहाटे ५ पर्यंत बडे बाबांच्या समाधीला चंदनाचा सुगंधी लेप लावण्यात येतो व नंतर वस्ञ(गलफ)फुलांची चादर व त्यावर अत्तर,गुलाब जल अर्पण करुण महापुजा करण्यात येते व सुर्योदयापुर्वी नाथांची समाधी झाकली जाते.वर्षातुन फक्त एकदाच नाथांची समाधी उघडली जाते.त्यामुळे लाखो नाथभक्त या महापूजेला उपथित राहतात .
श्री नाथ महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात तसेच दर महिनेच्या अमावस्येला मायंबा येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.भंडाऱ्यासाठी अनेक भाविकांनी स्वःईच्छेने देणगी रोख स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात(किराणा माल)दिली होती,आजच्या महाप्रसादामध्ये पुरी भाजी,पुलाव थंड शरबत, पाणी बॉटल व आवश्यकता असणाऱ्यांना मोफत गोळया औषधें देण्यात आली,कार्यक्रम यशश्वीतेसाठी श्री नाथ महाराज समाधी मंदिर तसेच श्री सद्गुरू शंकर महाराज मठ भक्त मंडळाने प्रयत्न केले .