Breaking
ब्रेकिंग

गुहा येथील रूपाली बोरुडे यांची वर्ग २ राजपत्रित अधिकारी पदावर निवड

0 8 6 7 4 2

गुहा येथील रूपाली बोरुडे यांची वर्ग २ राजपत्रित अधिकारी पदावर निवड

राहुरी तालुका जावेद शेख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षेत राहुरी तालुक्यातील गुहा येथील रुपाली अजिंक्य बोरुडे यांना यश मिळाले आहे. त्यांची सहाय्यक अभियंता पीडब्ल्यूडी (वर्ग २ राजपात्रित अधिकारी) या पदावर निवड झाली आहे. त्यांची जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, स्टाफ सिलेकशन कमिशन या सर्व विभागांमध्ये स्पर्धा परीक्षा लद्वारे कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाली होती. गेल्या वर्षभरात स्पर्धा परीक्षेत हे त्यांचे चौथे यश आहे.

रुपाली बोरुडे या बी.ई सिविल, एम.ई स्ट्रकचर असून सध्या त्या जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले असतानाही आई सासू-सासऱ्यांच्या, मामा-मामींच्या पाठबळामुळे यशाला गवसणी घातली आहे. राहुरी पंचायत समितीचे माजी सदस्य कै. गुलाबराव बोरुडे व श्रीराम दूध संघांचे संचालक दिलीपराव बोरुडे यांचा त्या सुनबाई  तर इंजिनिअर अजिंक्य बोरुडे यांच्या पत्नी आहे.

सासू-सासऱ्यांच्या रूपाने आई-वडील मलाभेटले त्यामुळेच मी हे यशाचे शिखर गाठू शकले, प्रत्येक मुलीला आई-वडील रुपी सासू-सासरे भेटले पाठबळ देणारे मामा-मामी सारखे नातेवाईक भेटले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्त्री शिक्षणाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समोर ठेवून उत्तम प्रशासकीय काम करणार असल्याची प्रतिक्रिया रुपाली बोरुडे यांनी दिली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे