Breaking
ब्रेकिंग

स्नेहबंध’चे नि:स्वार्थ भावनेने सामाजिक, शैक्षणिक काम : ब्रिगेडियर अजय दलाल

स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सत्कार

0 3 9 0 6 1

स्नेहबंध’चे नि:स्वार्थ भावनेने सामाजिक, शैक्षणिक काम : ब्रिगेडियर अजय दलाल

स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सत्कार

प्रतिनिधी : संजय वायकर

अहिल्यानगर :  समाजातील गरजू, वंचित, निराधार, गरीब विद्यार्थी व ज्येष्ठांसाठी नि:स्वार्थ भावनेने स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे कार्य करत आहे, असे प्रतिपादन एसीसी अँड एस कमांड चे ब्रिगेडियर अजय दलाल यांनी केले.
सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल  ब्रिगेडियर अजय दलाल यांनी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मिलिटरी हॉस्पिटलचे कर्नल डॉ. नितुल बेवाल, लेफ्ट. कर्नल ओहलाम, टुरिस्ट गाईड अमोल बास्कर, स्वयंम बास्कर उपस्थित होते.

ब्रिगेडियर दलाल म्हणाले, स्नेहबंध फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. उद्धव शिंदे हे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात, तसेच पर्यावरण रक्षणासाठी ही वृक्ष लागवडीद्वारे कार्य करत आहेत. त्यांनी गेल्या आठ वर्षात अनेक झाडे लावली आहेत, समाजातील वंचितांबद्दल व पर्यावरण रक्षणाबद्दलची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो. कर्नल डॉ. नितुल बेवाल, लेफ्ट. कर्नल ओहलाम, यांनीही स्नेहबंधच्या कार्याचे कौतुक केले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे