संभाजीनगर येथे राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक ची आढावा बैठक संपन्न

संभाजीनगर येथे राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक ची आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३/ संभाजीनगर येथे 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक ची आढावा बैठक संपन्न झाली. हि बैठक डॉ. कैलास भाऊ कदम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ( इंटक ) यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यपद्धती, संघटनेचा विस्तार , संघटित व असंघटित कामगार सभासद नोंदणी आणि त्यावरील उपाययोजनांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
हि बैठक (इंटक) चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असुन या बैठकीसाठी महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्ष अनिताताई गोरे, मुंबई अध्यक्ष अमित भटनागर, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष प्रज्ञाताई कांबळे, इंटकचे काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, जिल्हा सचिव सखाराम बेंगडे, संभाजीनगर उपजिल्हाध्यक्ष सलीम भाई पटेल, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव साहेब, अमरावती जिल्हाध्यक्ष रेखाताई हजारे, कन्नडचे तालुकाध्यक्ष हरीश राठोड, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष तसेच इंटक चे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संघटनेच्या पुढील कार्यप्रणालीबाबत दिशा ठरवण्यात आली असून, विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.