महावीर दिगंबर जैन मंदिर अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

महावीर दिगंबर जैन मंदिर अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
एस डब्ल्यू न्यूज / प्रतिनिधी
अहिल्यानगर : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा होतो . भारताचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार … .
नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अहिल्यानगर येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर ,महाजन गल्ली येथे शंका समाधान प्रणेते व भावना योग चे प पू मुनींश्री प्रणाम सागरजी गुरुदेवांच्या आशीर्वाद व त्यांच्या सानिध्यात भावनायोग प्रशिक्षकाचे प्रशिक्षण घेतलेले, आपल्या शहराचे भुषण , श्री शिरीषजी बेगडे यांनी भावना योग चे आयोजन केले होते व त्यासाठी समाजातील बहुसंख्येने समाज बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांनी विविध योग प्रकार करून योग दिन साजरा केला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम सौ .औटी यांनी मंगलाचरण सादर केले . यानंतर समाजातील सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मुनींश्री ना नमोस्तू केला. यानंतर श्री बेगडे यांनी भावना योग त्याचे महत्व, व पद्धत विस्तार स्वरूपात सांगून मुनींश्री च्या मुखारविंदातून २२ मिनिटांचा भावना योग झाला.
याप्रसंगी समाजातील सर्वश्री भारतभुषण भागवत, SBI मेॅनेजर लोहाडे, महाजन, बडजाते ,अंभोरे,गंगवाल, पानगावकर, डेरे, अरुण बेगडे, पांडे,महंत,भोसे ,भाळवणकर, चुडीवाल, प्रथमशेट्टी, अन्नदाते, देशमाने,पांगळ , वायकर, व इतर अनेक मान्यवर श्रावक श्राविका उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या शेवटी सौ नीता प्रथमशेट्टी यांनी मंगलागीताचे गायन केले. सौ निता भाळवणकर यांनी सुत्रसंचालन केले . संजय महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.