प्रजासत्ताक दिना निमित्त गयाबाई बहुउद्देशीय संस्था आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी तर्फे फ्री फिटनेस कॅम्प उत्साहात संपन्न
प्रजासत्ताक दिना निमित्त गयाबाई बहुउद्देशीय संस्था आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी तर्फे फ्री फिटनेस कॅम्प उत्साहात संपन्न
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३१/ करमाळा येथे प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य (NGO) आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी तर्फे आयोजित तीन दिवसीय फ्री फिटनेस कॅम्प मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 26 जानेवारी संध्याकाळी पाच वाजता माननीय ॲड. बाबुराव हिरडे यांच्या हस्ते या फिटनेस कॅम्पचे उद्घाटन झाले. यावेळी संबोधित करताना महेश वैद्य करत असलेले कार्य खूप मोठे आहे त्याला मोलाची साथ समाजसेवक किसन कांबळे सर देत आहेत असे गौरव उद्दगार त्यांनी यावेळेस काढले. तसेच भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी एकलव्य शाळेचे रामकृष्ण माने सर, पत्रकार अशपाक भाई, पत्रकार नरेंद्र ठाकूर, भाजपच्या रेणुका ताई, राऊत मॅडम, ग्राहक संरक्षण व पंचायत चे संजय मोरे इं. उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ॲड. लताताई पाटील उपस्थित होत्या. त्यांनी अशा प्रकारचे काम सतत होण्याची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले. जेऊर येथील भारत हायस्कूलचे प्राध्यापक समाजसेवक संजय राजेघोरपडे सर वेळ काढून उपस्थित राहिले आणि संबोधित करून फिटनेस कॅम्पला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कॅम्पच्या पहिल्या दिवशी 125 जणांनी सहभाग नोंदविला. यावेळेस पोफळज जिल्हा परिषद शाळेच्या विनंतीवरून समाजसेवक किसन कांबळे सर आणि फिटनेस कोच महेश वैद्य यांनी फिटनेस वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फिटनेस कॅम्पला तीन दिवस सहभागी होणारे संजय मोरे, व्यापारी टेके तसेच करमाळा कॉटेज या शासकीय रुग्णालयातील गजानन विभुते सर सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी 800 जणांनी यामध्ये सहभाग नोंदविला. वीट येथील जिल्हा परिषद शाळेच्या विनंती वरून कार्यक्रमाचे प्रशिक्षक महेश वैदय यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेत जाऊन फिटनेस शिबीर आयोजन केले. यावेळेस 245 विद्यार्थिनी तसेच शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला. यावेळेस चंद्रकांत चोरमले सर, एच यू जाधव, मुख्याध्यापक जनार्दन घाडगे सर यांनी फिटनेस कॅम्प मध्ये सहभाग नोंदवला. फ्री फिटनेस कॅम्प अंतर्गत करमाळा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक यांना नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान याविषयी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी करमाळा तालुक्यातील 300 मुख्याध्यापक उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी 4:30 वाजता नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना फिटनेस कॅम्प अंतर्गत व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळेस प्रशिक्षक महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांनी व्यायामाचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे या बद्दल मार्गदर्शन केले. यावेळेस सुनिल जाधव सर, उबाळे मॅडम, जोशी मॅडम आणि इतर शिक्षक गण उपस्थित होते. यावेळी साधारणपणे 175 जणांनी फिटनेस कॅम्प मध्ये सहभाग घेतला. संध्याकाळी साडेसात वाजता एस एस जिम येथे जिम मधील व्यायाम पट्टूंना जिम मध्ये व्यायाम करत असताना कोणत्याही प्रकारची नशा करणे किती घातक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. आणि प्रोटीनचे नावाखाली स्टेरॉईड चे सर्रास वापर होतो परंतु हे सर्व तात्कालिक आहे भविष्यात याचा खूप गंभीर असा परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे त्यापासून अलिप्त रहावे आणि शरीरातील ताकद हळूहळू वाढत असते त्याला एकदम वाढवण्यावर भर देऊ नका आणि व्यायाम करत असताना श्वास कधी घ्यायचा किती वेळ रोखून धरायचा आणि श्वास कसा सोडायचा याबद्दल प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळेस जिम चे मालक समीर सय्यद उपस्थित होते. करमाळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे जिम चालवणे हे एक अतिशय मौल्यवान काम करतात असे म्हणून महेश वैद्य यांनी समीर सय्यद यांच्या कामाची प्रशंसा केली. यावेळी समाजसेवक किसन कांबळे सर यांनी संबंधितांना मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे 60 ते 70 व्यायाम पट्टू उपस्थित होते.
फिटनेस कॅम्पच्या तिसऱ्या दिवशी फिटनेस कॅम्प मध्ये 125 ते 150 महिलांनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षक महेश वैद्य यांनी महिलांना व्यायाम कसे करायचे व्यायामाचे महत्त्व समजून सांगितले आणि त्यांच्याकडून बेसिक व्यायाम करून घेतला. बऱ्याच महिलांचा असा समज असतो की आपण घरामध्ये भरपूर काम करतो तो आमचा व्यायाम असतो परंतु तो व्यायाम नसून ते परिश्रम असतात आणि ज्यावेळी आपण परिश्रम करतो त्यावेळेस आपल्या शरीराची झीज होत असते आणि ती न होण्यासाठी व्यायामाची गरज असते परिश्रम आणि व्यायाम यामधील फरक महिलांना समजून सांगितला. ग्रामीण भागामधील महिलांमध्ये तंबाखू गुटखा खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे याबद्दल महेश वैद्य यांनी चिंता व्यक्त केली. आणि घरातील महिलांनी याबाबत अतिशय सावधगिरीने राहिले पाहिजे घरातील महिला व पुरुष प्रमुख असतात त्यांनी जर व्यसन केले तर त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होतो याची जाणीव महिलांनी व पुरुषांनी ठेवली पाहिजे असे स्पष्ट मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपाचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले घरातील स्त्री व पुरुष जर व्यसनी असतील तर संपूर्ण कुटुंब नशेच्या आहारी जाण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे घरातील स्त्री आणि पुरुषांनी व्यसनमुक्त आणि व्यायामाद्वारे सशक्त राहिली पाहिजे. त्यासाठी त्यांनी उद्यापासूनच याचे अनुकरण केले पाहिजे तरच देशाला उज्वल भविष्य आहे असे परखड मत समाजसेवक राजाभाऊ कदम यांनी व्यक्त केले. राजाभाऊ कदम यांनी महेश वैद्य हे करत असलेले काम नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान हे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडविणारे कार्य आहे. अतिशय खडतर मार्गातून ते कार्य करीत आहेत अशा शब्दात त्यांनी महेश वैद्य करीत असलेल्या कामाचा गौरव केला.
महेश वैद्य यांना मोलाचे साथ देणारे समाजसेवक किसन कांबळे सर यांचा गौरव केला आणि गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था करीत असलेल्या अनेक प्रकारच्या सामाजिक कामाचा गौरव केला.
त्यामध्ये मोफत नेतृत्व असते अथवा कमी पैशातील महिलांच्या डिलिव्हरीचे पॅकेज असो अशा प्रकारचे समाजकार्य ते सतत करीत आहेत. त्यांच्या कामात त्यांना यश येवो असे गौरवोद्गार समाजसेवक राजाभाऊ कदम यांनी काढले.
संस्थेच्या सचिव कल्पना ताई वाघमारे मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करताना जीवनातील व्यायामाचे महत्त्व समजून सांगितले आणि किसन कांबळे सर यांनी स्थापन केलेल्या गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेबद्दल माहिती दिली. ही संस्था आजी आणि नातवाच्या प्रेमळ संबंधातून साकार झालेली संस्था म्हणजे गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर हे आपली आजी गयाबाई यांच्यावर नितांत श्रद्धा आणि प्रेम करीत आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था याची स्थापना केली आणि त्या आधारे स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आहे. दोघेही पती-पत्नी आपापली जबाबदारी नोकरी सांभाळून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. असे मोलाचे विचार कल्पना ताई वाघमारे मॅडम यांनी मांडले. त्यांच्या या कामास प्रभावित होऊन महेश वैद्य यांनी या संस्थेचा उपक्रमात नेहमी सहभाग घेतला आणि भविष्यात घेतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे साहेब व संस्थेचे सचिव कल्पना वाघमारे मॅडम यांनी व्यक्त केला. यावेळेस संबोधित करताना गुरुवारी विनोद कुमार गांधी यांनी मोलाची मार्गदर्शन केले एक वेळेस जेवण केले नाही तर चालेल पण व्यायाम दररोज करावा आणि आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे महिलांना विशेषतः त्याची खूप गरज आहे. यावेळी पत्रकार नरेंद्र ठाकूर यांनी आपले विचार प्रकट केले आणि महेश वैद्य आणि किसन कांबळे करत असलेल्या कामाचा गौरव केला आणि हे दोघेही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत आहेत मार्ग कठीण आहे परंतु त्यात ते नक्कीच यशस्वी होतील आणि आपल्या सर्वांची त्यांना नक्कीच साथ आहे असे मोलाचे विचार त्यांनी व्यक्त केले. यावेळेस बोलताना ॲड. सुहास कानगुडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत हे अभियान महेश वैद्य राबवत आहेत ही काळाची गरज आहे याची व्यापकता वाढली पाहिजे आणि आपण सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. काम अवघड आहे पण अशक्य नाही अशा शब्दात त्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि या अशा प्रकारचे फिटनेस कॅम्प वेळोवेळी घेतले पाहिजेत आणि सामाजिक संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र ठाकूर यांनी केले तर प्रास्ताविक गयाबाई बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किसन कांबळे सर यांनी केले.
यावेळी राजाभाऊ कदम आणि गुरुवर्य विनोद कुमार गांधी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास पुण्याहून आवर्जून उपस्थित असलेले संतोष कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले आणि अशा प्रकारचे कॅम्प ग्रामीण भागात घेण्यात यावेत अशी विनंती केली. या कार्यक्रमाला करमाळ्यातील डॉ. श्रीराम परदेशी यांनी फोनवरून मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळेस करमाळ्यातील आदिनाथ मोटर्सचे मालक महेश दोशी तसेच मित्रवर्य प्रताप कांबळे, दिनेश सोरटे यांची समाजाबद्दल असलेली तळमळ व कसे सर्वांनी नशा मुक्त आणि सशक्त राहावे यासाठी प्रयत्न करणारे महेश वैद्य यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना महेश वैद्य म्हणाले समाज सेवेची प्रेरणा मला माझी आई वनमला बबनराव वैद्य यांच्यापासून मिळाली माझी आई खूप प्रेमळ होती. तिचे आशीर्वाद माझ्यासोबत कायम आहेत अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली. तसेच आमचे मित्र, सर्व पत्रकार बंधू त्यामध्ये अलीम भाई, अशपाक भाई, सूर्यकांत होनप, सचिन जव्हेरी, सुनील भोसले, सुनील सूर्यपुजारी, विवेक येवले, अशोक मुरूमकर, विशाल घोलप, तसेच समर्थ लेखणीचे अविनाश जोशी, सिद्धार्थ वाघमारे , जयंत दळवी यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले आणि सहकार्य लाभत आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार यावेळी नशा मुक्त भारतचे ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य आणि गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य (NGO) याचे संस्थापक अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी मांनले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिलांमध्ये व्यायामाप्रती जागृती निर्माण करण्यासाठी वंदना कांबळे , अश्विनी कांबळे , स्वाती मोरे, रुकसाना पठाण आदी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला जयवंतराव जगताप बहुउद्देशीय सभागृह नगरपालिकेचे माननीय सी. ई. ओ. साहेबांच्या सहकार्याने हॉल उपलब्ध झाला त्याबद्दल त्यांचे आभार हॅप्पी मॅन हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमीचे अध्यक्ष महेश वैद्य आणि गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे यांनी मानले.



