पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य आपल्या दारी व्याधीमुक्त सप्ताह अंतर्गत भव्य मोफत महाआरोग्यसेवा शिबिराचे विशेष आयोजन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य आपल्या दारी व्याधीमुक्त सप्ताह अंतर्गत भव्य मोफत महाआरोग्यसेवा शिबिराचे विशेष आयोजन
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगांव – सर्वसामान्यांचे लाडके नेते विकास पुरुष ना. गुलाबराव पाटील (स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या ५ जून २०२५ रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भव्य व मोफत आरोग्य तपासणी शिबिर सप्ताह आयोजित करण्यात आले आहे.
२८ मे २०२५ पासून ते ४ जून २०२५ रोजी पर्यंत आरोग्य शिबिरांचे आयोजन अनुक्रमे आव्हाने, म्हसावद, भोकर, शिरसोली, धरणगाव, पिंप्री व पाळधी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
त्याचा लाभ परिसरातील गरजू रुग्णांना मिळावा ह्या साठी हे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये प्रामुख्याने खालील उद्दिष्टे साकारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हृदयरोगा संबंधित प्राथमिक तपासणीचे उद्दिष्ट, बदलत्या जीवनशैलीमुळे व आजकाल जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या हृदयाच्या येणाऱ्या झटक्या च्या अनुषंगाने 40 वर्ष किंवा त्यावरील वयोगटाच्या जास्तीत जास्त किंबहुना सर्वच नागरिकांचे हृदय संबंधित प्राथमिक ईसीजी तपासणी घेण्याचे उद्दिष्ट, ज्या नागरिकांच्या ईसीजी तपासणी मध्ये काही ठळक असे बदल दिसून येत असतील तर त्यांचे अँजिओग्राफी तपासणी ही सवलतीच्या दरात करून देण्याचे उद्दिष्ट, ज्या नागरिकांच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया तसेच इतर कोणतीही शस्त्रक्रिया आढळून येत असतील तर त्यांच्या शस्त्रक्रिया योजनेतून मोफत करण्याचे उद्दिष्ट, महिला वर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या स्तन कॅन्सर व गर्भाशयाचे मुखाच्या कॅन्सर संदर्भातील मॅमोग्राफी व पॅप स्मिअर करणे गरजेचे असेल त्यांच्या त्या तपासण्या मोफत करून देण्याचे उद्दिष्ट, रक्तातील हिमोग्लोबिन तसेच साखरेचे प्रमाण व इतर रक्ताशी संबंधित तपासण्या मोफत करून देण्याचे उद्दिष्ट सर्वसाधारण गाठी, वाढणाऱ्या गाठी तसेच न सुधारणाऱ्या गाठी यांच्या संबंधित प्राथमिक तपासण्या करण्याचे उद्दिष्ट, ज्या सजग नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व माहित आहे किंवा उस्फूर्तपणे ज्यांना रक्तदान करावयाचे आहे त्यांचे रक्त हे इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्तपेढी तसेच माधवराव गोळवलकर रक्त पेढी यांचे मार्फत संकलन करण्याचे उद्दिष्ट, आयुष्मान कार्ड काढणे व एकत्रित महात्मा ज्योतिराव फले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या संदर्भात जनजागृती करण्याचे उद्दिष्ट, ४ जून रोजी पाळधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित आरोग्य शिबिरात ज्या नागरिकांना हाडांशी संदर्भात संधिवात किंवा हाडे ढिसुळ होणे याच्या संदर्भातील तपासण्या करावयाच्या असतील किंवा त्यावर उपचार करावयाचे असतील तर ते मोफत करून देण्याचे उद्दिष्ट.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी वरील आरोग्य शिबिरांचा आपल्या आपल्या ठिकाणी किंवा नजिकच्या ठिकाणी लाभघ्यावा व आपल्या तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन सर्वांना करण्यात येत आहे.अधिक माहिती साठी संबंधित गावातील नागरिकांनी खालील पदाधिकारी यांचेशी संपर्क साधावा व माहिती घ्यावी. अशी विनंती आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. विलास चौधरी व राकेश चौधरी आव्हाने, जळगाव, गोविंदा पवार व समाधान चिंचोले, म्हसावद, लाठी व प्रकाश सोनवणे भोकर, शिवदास बारी व नंदू पाटील, शिरसोली, पप्पू भावे व विलास महाजन, धरणगाव, गोपालबापू चौधरी, पिंप्री, भूषण पाटील, सागर पाटील व आबा माळी, अरुण पाटील, पाळधी, रक्तदान शिबिर समन्वयक मुकुंद गोसावी, अध्यक्ष, मुक्ति फाउंडेशन जळगाव. संपर्क क्रमांक 9322589099 आरोग्य सप्ताह शिबिर समन्वयक प्रताप गुलाबराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, पाळधी, जळगाव. डॉ. योगेश पाटील (रेल, जळगाव) विभाग प्रमुख, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. संपर्क क्रमांक 09405759299,08275095074 यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.