Breaking
ब्रेकिंग

डॉ. बाळकृष्ण पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान

0 3 9 0 8 1

डॉ. बाळकृष्ण पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान

अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे

डॉ. बाळकृष्ण पाटील यांना मुंबई विद्यापीठाने कला शाखेत विशेष प्राविण्यासह श्रमिक अभ्यासामध्ये ७ जानेवारी २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर हॉल येथे झालेल्या पदवीदान समारंभात तत्वज्ञान विषयातील मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. बाळकृष्ण यांच्या संशोधनाचे निष्कर्ष महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील उद्योगांवर सकारात्मक आणि दूरगामी परिणाम घडवून आणण्याची क्षमता ठेवतात.
या संशोधनामुळे एचआर/औद्योगिक संबंध व्यावसायिक, विद्वान, कर्मचारी आणि कामगार संघटनांना महत्त्वपूर्ण दिशा मिळेल. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात सशक्त आणि सुसंवादी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन उद्योगांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल.
डॉ. पाटील यांचे संशोधन औद्योगिक संबंधांच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल, असे मानले जाते. त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष आणि शिफारसी अकादमिक क्षेत्र, संशोधक, आणि औद्योगिक आस्थापनांच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.
डॉ. राजन टुंगारे यांचे मार्गद्शनाखाली पाटील यांनी हे यश मिळविले.त्या बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे