पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त नवरात्रीचे नऊ रंग या कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १९/ सालाबाद प्रमाणे यावर्षीही पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त नवरात्रीचे नऊ रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी महिलांना केले आहे.
ही स्पर्धा घटस्थापने पासून सुरू होणार आहे. यामध्ये स्पर्धकांनी रोजचा नवरात्रीचा जो कलर असेल त्या रंगाची साडी परिधान करून आपला फोटो काढून संयोजकांना पाठवायचा आहे. ही स्पर्धा करमाळा शहर गट तसेच करमाळा ग्रामीण गट या दोन गटासाठी होणार असून या स्पर्धेसाठी विविध बक्षीसे ठेवण्यात आलेले आहेत.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस:- २४ इंची एलईडी टीव्ही.
द्वितीय क्रमांक:- केनस्टार एअर कुलर.
तृतीय बक्षीस:- मिक्सर.
चतुर्थ बक्षीस:- टेबल फॅन व इस्त्री.
पाचवे बक्षीस:- हॉट प्लेट शेगडी.
तसेच उत्तेजनार्थ बक्षीस मध्ये पैठणी साड्या देण्यात येणार आहेत त्याशिवाय प्रत्येक गटातून पंचवीस उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ बक्षीसही देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.
अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संयोजिका अश्विनी शिवनाथ घोलप यांच्याशी संपर्क साधावा.
संपर्क नंबर:- ८६०५७८२९९६. अश्विनी विश्वनाथ घोलप



