Breaking
ब्रेकिंग

कवी संजय महाजन ‘राष्ट्रीय काव्य शिरोमणी’ पुरस्काराने सन्मानित

0 8 6 7 2 5

कवी संजय महाजन ‘राष्ट्रीय काव्य शिरोमणी ‘ पुरस्काराने सन्मानित

एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट

अहिल्यानगर : विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या भारत सरकार द्वारे नोंदणीकृत संस्थेमार्फत राष्ट्रीय काव्य शिरोमणी 2026 पुरस्काराने अहिल्यानगर चे लोकप्रिय कवि श्री .संजय महाजन यांना सन्मानित करण्यात आले . महिला आयोगाच्या अध्यक्षा सानीपिना मॅडम यांचे हस्ते दिल्लीत झालेल्या काव्य संमेलनात हा पुरस्कार देण्यात आला .
यावेळी संस्थेचे ग्लोबल अध्यक्षा सौ . हेमलता गिते मॅडम सह कार्याध्यक्ष श्री . धनंजय गोरे व संयोजक   श्री . शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

अहिल्यानगरचे रहिवाशी असलेले संजय कपुरचंद महाजन यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत .
महाराष्ट्रातील काही संस्थेच्या वतीने त्यांना विविध ८ पुरस्काराने सन्मानित ही करण्यात आले आहे . आतापर्यंत एकूण ५५ सन्मान चिन्ह त्यांना मिळालेले असून त्यांनी इतर ६ काव्यसंग्रहात कविता सादर केल्या आहेत .

राजधानी दिल्लीत हा पुरस्कार मिळाल्यामुळे अहिल्यानगर येथील सर्व कविप्रेमी यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असून सर्व सामाजिक राजकीय स्तरातून महाजन यांच्यावर कौतुकांचा  वर्षाव  होत  आहे .सर्व मित्र परिवार व सर्व नातेसंबंधी व सकल जैन समाजाने त्यांचे अभिनंदन करून साहित्य क्षेत्रात उत्तुंग झेप घेत प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे