महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे होणार उदघाटन

महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे होणार उदघाटन
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचे 27 कोटी रुपये निधीमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह भव्य इमारत निर्माण झाले असून कृषी विद्यापीठ प्रशासकीय इमारती लगत याची निर्मिती करण्यात आलेली आहे.
जवळपास 5000 नागरिकांची बैठक व्यवस्था व सुविधा या सभागृहामध्ये केली असून राज्यामध्ये सर्वात मोठे व भव्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे सभागृह सामाजिक न्याय विभागाच्या भरीव निधी मधून साकारण्यात आलेले आहे.
अतिशय प्रशस्त व भव्य सभाग्रहामुळे
विद्यापीठाच्या परिसराची प्रतिष्ठा वाढली आहे.
देशाचे संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने साकारण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयाच्या इमारतीसाठी जवळपास दोन वर्ष कालावधी लागला असून या इमारतीच्या उद्घाटन सोहळायासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे मामा. व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील. विधानपरिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब.
तसेच वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व कामगार राज्यमंत्री माननीय ऍड आशिष जयस्वाल व महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष माननीय तुषार पवार तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू विलास खर्चे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून
त्यानंतर फुले कृषी महोत्सव 2026 शिवार कृषी प्रदर्शन कडधान्य वाणाची माहिती चारा पिके ड्रोन तंत्रज्ञान थेट प्रात्यक्षिके विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पहावयास मिळणार आहे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्याची आश्वासन कुलगुरू माननीय डॉक्टर विलास खर्चे यांच्या वतीने करण्यात येत आहे .



